आशा बुचके यांचा भाजपमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:15 AM2021-08-20T04:15:56+5:302021-08-20T04:15:56+5:30
पुणे जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी कार्यकर्त्यांसह मुंबई येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला. यावेळी त्यांचे स्वागत करताना फडणवीस ...
पुणे जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी कार्यकर्त्यांसह मुंबई येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला. यावेळी त्यांचे स्वागत करताना फडणवीस बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून गुरुवारी अखेर बुचके यांनी मुंबई येथे भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
फडणवीस म्हणाले की, बुचके यांनी विधानसभेत जावे ही जनतेची इच्छा होती पण दुर्दैवाने प्रत्येकवेळी राजकीय घात झाल्याने त्या विधानसभेत जाऊ शकल्या नाहीत. शिवसेनेत असताना ज्याप्रमाणे आशाताईंचा श्वास कोंडत होता त्याचप्रमाणे आमचाही श्वास कोंडत होता. आता सध्या या सरकारचा श्वास कोंडायला लागला आहे. असेही यावेळी फडणवीस म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजप पूर्ण क्षमतेने आशा बुचके यांच्या पाठीशी उभे राहील. जुन्नर मतदारसंघातील संघटनात्मक सर्व निर्णय, सर्व निवडणुकांचे निर्णय, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आशा बुचके यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतले जातील तसेच त्यांच्या शब्दाला मान दिला जाईल. जुन्नर तालुका म्हणजे आशा बुचके अशी ओळख करून आशा बुचके या विजयी होतील, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला जाईल, त्यांना पक्षाकडून वेळोवेळी बळ दिले जाईल."
--
फोटो क्रमांक : १९ खोडद आशा बुचके
फोटो ओळी : आशा बुचके यांचे भाजप पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे स्वागत करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील.