आशा सेविका, गटप्रर्वकांना धुव्र प्रतिष्ठान तर्फे रेनकोट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:34+5:302021-08-01T04:09:34+5:30
ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व पटवून देणे, ताप, हगवण, लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार, डॉट्स, फाॅलिक ...
ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व पटवून देणे, ताप, हगवण, लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार, डॉट्स, फाॅलिक क्लोरोक्वीन गोळयाचे वाटप करणे.
ग्रामीण महिलांना बाळंतपण सुखरुप प्रसुती, स्तनपान, लसीकरण गर्भप्रतिबंधक उपाययोजना, जननेद्रीयांशी संबंधित जंतुसंसर्ग, लैगिंक संबंधातुन होणारे जंतुसंसर्ग, नवजात अर्भकाची काळजी विषयी मदत व मार्गदर्शन त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती आरोग्य यंत्रणेला देणे नवजात बालकांचे मृत्यू, बालमृत्यू व माता मृत्यू कमी करण्यात मदत करणे. अशा स्वरुपाची कामे आशा सेविका करतात, शासनाने प्रत्येक गावात लोकसंख्येनुसार आशा सेविका पद निर्मिती केली आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रेनकोटची गरज लक्षात घेऊन ध्रुव प्रतिष्ठानने सुमारे १ लक्ष २० हजार रुपये खर्चून संपूर्ण भोर तालुक्यातील आशा सेविकांना रेनकोट वाटप करण्यात येणार असल्याचे ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले.
यावेळी प्रसंगी राजीव केळकर,डॉ.सायली बदक गट प्रवर्तक मनीषा डाळ, सुरेखा म्हस्के, गणेश वरे, आरोग्य सेविका शबाना इनामदार , वैयजंता शिवतरे , रेश्मा डाळ,संजिवनी लोखंडे,रेखा शिंदे,ज्योती गाढवे, मनिषा चिखले,रेश्मा गायकवाड, निर्मला म्हस्के,शांता बढे,छाया यादव, रुपाली भोसले,नयना खोपडे व आशा सेविका उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ३१ भोर रेनकोट वाटप
फोटो ओळी : आशा सेविकांना रेनकोट वाटप करताना धुव्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी
310721\31pun_1_31072021_6.jpg
फोटो क्रमांक : ३१ भोर रेनकोट वाटपफोटो ओळी : आशा सेविकांना रेनकोट वाटप करताना धुव्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी