आशा सेविकांचे कामच सन्मानाचे : डॉ. नीलम गोऱ्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:14 AM2021-09-09T04:14:14+5:302021-09-09T04:14:14+5:30
नसरापूर : कोरोना काळात आशा सेविकांनी जिवाची पर्वा न करता महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेकदा सेवा बजावताना प्रवासासाठी ...
नसरापूर : कोरोना काळात आशा सेविकांनी जिवाची पर्वा न करता महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेकदा सेवा बजावताना प्रवासासाठी आशा सेविकांना वाहने उपलब्ध होत नाहीत. यासाठी थोड्या कालावधीत त्यांना सायकल किंवा दुचाकी मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, तसेच वाढीव कामाचा मोबदला, सोयीसुविधा आणि समाजात सन्मान मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
शिवसेनेच्यावतीने भोर तालुक्यातील डॉक्टर, पोलीस व प्रशासनातील अधिकारी वर्ग, आशा सेविका, परिचारिका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत पदाधिकारी व पत्रकार या कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा (कोरोना योद्धा पुरस्कार २०२१) वर्वे (ता.भोर) येथील शिवनेरी कार्यालयात पार पडला. याप्रसंगी डॉ.गोऱ्हे बोलत होत्या.
प्रास्ताविक जि.प. सदस्या शलाका कोंडे यांनी केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, रमेश कोंडे, सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे,पंचायत समिती सदस्या पूनम पांगारे, तालुकाप्रमुख माऊली शिंदे, युवराज जेधे, महिला आघाडीच्या संघटिका संगीता पवळे, स्वाती ढमाले, निशा सपकाळ, सुवर्णा करंजावणे, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी अविनाश बलकवडे, अमोल पांगारे, नितीन सोनवले, नारायण कोंडे, गणेश खुटवड, महेश कोंडे, दत्ता देशमाने, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली ,जालिंदर बरकडे, डॉ.सविता डिंबळे, समाजसेवक राजीव केळकर आदीं मान्यवर आणि आशासेविका आदी यावेळी उपस्थित होते.
वरवे (ता.भोर) येथे शिवसेनेच्यावतीने भोर तालुक्यातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा घेतला त्याप्रसंगी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे.
080921\img_20210907_162023__01.jpg
???? ???? : ???? ( ??.???)???? ???????????????? ??? ??????????? ?????? ??????????? ?????? ????? ????? ??????????? ??????? ??. ???? ??????