‘आशा’ने पेलली कुटुंबाची जबाबदारी!
By admin | Published: March 8, 2017 04:55 AM2017-03-08T04:55:02+5:302017-03-08T04:55:02+5:30
खेड तालुक्यातील कान्हेवाडी येथील एका महिलेने दूध व्यवसायात भरारी घेत आपल्या संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी आपल्या खांद्यावर लीलया पेलली आहे. आशा रूके असे त्यांचे नाव असून कुटुंबाच्या हितासाठी
- तुषार मोढवे, चासकमान
खेड तालुक्यातील कान्हेवाडी येथील एका महिलेने दूध व्यवसायात भरारी घेत आपल्या संपूर्ण कुटुंबांची जबाबदारी आपल्या खांद्यावर लीलया पेलली आहे. आशा रूके असे त्यांचे नाव असून कुटुंबाच्या हितासाठी
त्या वंशाचा दिवा बनल्या आहेत.
चासकमान येथील आशा रूके यांनी मुलीही कुटुंबाची जबाबदारी स्वतंत्ररित्या पार पाडू शकतात हे सिद्ध केले आहे.
घरामध्ये कुणाचेही पाठबळ नसतांना त्यांनी दूध व्यवसायाला सुरूवात केली. सुरूवातीला खडतर प्रवास करत अपयशाने खचून न जाता शेतीत राबवून दुग्ध व्यवसाय सांभाळला.
त्यांच्याकडे आज सात जर्शी गायी असून दररोज ४० लिटर दुधाचे उत्पादन त्या घेत आहे. तसेच शेतीच्या कामासाठी तीन बैल आहेत. स्वत: घरातील पुरुषांचे पाठबळ नसतानाही स्वत: शेती करून दूधधंदा सांभाळत आहे. दररोज दूध काढून त्या
स्वत: मोटार सायकल चालवून चार किमी अंतरावर कडधे, कान्हेवाडी आदी ठिकाणी खाजगी दूध सेंटरला घालत आहे.
हा विषय कुतूहलाचा विषय ठरत आहे. आशा रूके या इतर महिलांप्रमानेच शेतीत काबाडकष्ट करताना ३ बहिणींचे लग्न त्यांनी केले व आईसोबत रहात आहे. घरात भाऊ नसताना ८ एकर कोरडवाहू शेती करून आईला सांभाळत आहे. मुलाला वंशाचा दिवा म्हणून ग्रामीण भागात आजही पाहिले जाते. परंतु, कान्हेवाडी येथील खेड्यात भाऊ नसलेले दु:ख न बाळगता स्वत: च्या मेहनतीने घराचा वारसा त्या चालवत आहे.
घरामध्ये कुठल्याही पुरुषाचे पाठबळ नसताना स्वत: शेती करत शेतीला पाणी देणे, गाईच्या धारा काढणे व इतर सर्व कामे करीत असल्यामुळे सगळेच त्यांचे कौतुक करतात. (वार्ताहर)