आषाढी पायीवारी: "ग्यानबा तुकाराम" माऊलींच्या पालखीचे ११ जूनला प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 03:30 PM2023-04-12T15:30:34+5:302023-04-12T15:31:04+5:30

लाखो वारकऱ्यांसमवेत माऊली आषाढी एकादशीला विठुरायाच्या भेटीला

Ashadhi Piiwari: 'Gyanba Tukaram' Mauli's palanquin departs on June 11 | आषाढी पायीवारी: "ग्यानबा तुकाराम" माऊलींच्या पालखीचे ११ जूनला प्रस्थान

आषाढी पायीवारी: "ग्यानबा तुकाराम" माऊलींच्या पालखीचे ११ जूनला प्रस्थान

googlenewsNext

आळंदी : यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायीवारीसाठी ११ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली. 

प्रथा - परंपरेनुसार रविवार दि. ११ जूनला सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाजत - गाजत माउलींच्या पालखीचे प्रस्थान होईल. दर्शनबारी मंडपात (आजोळी) माउलींचा पहिला मुक्काम असणार आहे. १२ व १३ जूनला पालखी सोहळा पुण्यनगरीत मुक्कामी राहील. दि १४ व १५ सासवड, त्यानंतर १६ जेजुरी, १७ वाल्हे, १८ जूनला नीरा स्नाननंतर १९ जूनपर्यंत पालखी सोहळा लोणंद येथे मुक्कामी असेल. त्यांनतर २० तरडगाव, २१ जूनला फलटण, २२ बरड, २३ नातेपुते, २४ माळशिरस, २५ वेळापूर, २६ रोजी भंडीशेगाव, २७ वाखरी तर बुधवारी दि. २८ जूनला सोहळा श्री क्षेत्र पंढरपुरला मुक्कामी पोहोचेल. पंढरीत आषाढी एकादशीचा महासोहळा २९ जूनला संपन्न होईल. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व पादुकाजवळ उभे रिंगण तर पुरंदवडे, खुडूस फाटा, ठाकुरबुवाची समाधी व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.

पालखीचा असा असेल परतीचा प्रवास...  

३ जुलै पौर्णिमेपर्यंत सोहळा विठ्ठल नगरीत विसावेल. गोपालकाला होऊन सोहळा परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार आहे. परतीचा प्रवास ३ जुलै वाखरी, ४ जुलै वेळापूर, ५ जुलै नातेपुते, ६ जुलै फलटण, ७ जुलै पाडेगाव, ८ जुलै वाल्हे, ९ जुलै सासवड, १० जुलै हडपसर,  ११ जुलै पुणे, १२ जुलै आळंदी, १३ जुलैला आळंदीत नगरप्रदक्षिणा पूर्ण करून माऊलींच्या पादुका मंदिरात विसावतील अशी माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

Web Title: Ashadhi Piiwari: 'Gyanba Tukaram' Mauli's palanquin departs on June 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.