Ashadhi Wari 2024: पालखी मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट अन्नपदार्थांची होणार तपासणी
By विश्वास मोरे | Published: June 20, 2024 08:07 PM2024-06-20T20:07:28+5:302024-06-20T20:08:05+5:30
पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हातील पालखी मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने येथील खाद्यपदार्थ स्टालची अन्नपदार्थांची तपासणी होणार आहे. कारवाई केली जाणार आहे.....
पिंपरी : आषाढी वारी सोहळा तोंडावर आला आहे. जिल्हा प्रशासन, अन्न- औषध प्रशासन, देहू देवस्थान, आळंदी देवस्थानाची तयारी पूर्ण झालेली आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हातील पालखी मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने येथील खाद्यपदार्थ स्टालची अन्नपदार्थांची तपासणी होणार आहे. कारवाई केली जाणार आहे.
देहूगाव येथून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोहळ्याचे दिनांक २८ जूनला, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून २९ जूनला प्रस्थान होणार आहे. त्या निमित्ताने नुकतीच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी जिल्हा प्रशासनास सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार अन्न -औषध प्रशासन पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने यासंदर्भातील नियोजन केलेले आहे.
तीन जिल्ह्यात ३२ अधिकारी -
संत तुकाराम महाराज पालख्या पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून जातात. या तीनही जिल्ह्याचे नियोजन केले आहे. पालखी मार्गावर १६ विसाव्याची ठिकाणे आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये १६ मुक्काम आहेत तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये १५ मुक्काम आहेत. प्रशासनाची तयारी सुरू झालेली आहे.
अशी केली जाणार तपासणी-
१) पालखी मार्गावरील हॉटेल, हातगाड्या, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ स्टॉल येथील अन्नपदार्थांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यासाठी ३३ अधिकारी नियुक्त केलेले आहे.
३) पालखी काळामध्ये विसावे, मुक्कामांच्या ठिकाणी जाऊन, त्या ठिकाणी अन्नपदार्थांची तपासणी करणार आहे. तसेच अन्न परवाना आहे की नाही. नियमावलीनुसार अन्नपदार्थ शिजवले जातात की नाही, याविषयी तपासणी केली जाणार आहे. अन्नपदार्थांचे नमुने घेतले जाणार आहेत. त्या दोषी आढळल्यास संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
वारीच्या अनुषंगाने पालखी मार्गावरील विसाव्यांची ठिकाणे, तसेच हॉटेल, मिठाई दुकाने यामध्ये तयार केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची तपासणी केली जाणार आहे. तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होते की नाही याची तपासणी केली जाणार आहेत. नोटीस देण्याबरोबरच यामध्ये दोन दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पालखी सोहळा काळात अन्नपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आलेले आहे.
- सुरेश अन्नापुरे, अतिरिक्त आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन