Ashadhi Wari: वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट; पासेस घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 07:47 PM2023-06-15T19:47:45+5:302023-06-15T19:49:22+5:30

स्टिकर्स/ पासेस देण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे...

Ashadhi Wari: Exemption from road tax for vehicles of devotees going to Pandharpur for Wari | Ashadhi Wari: वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट; पासेस घेण्याचे आवाहन

Ashadhi Wari: वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट; पासेस घेण्याचे आवाहन

googlenewsNext

पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांच्या व वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना १३ जून ते ३ जुलै या कालावधीत पथकरातून सूट देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्टिकर्स/ पासेस देण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे.

पंढरपूर यात्रेस जाणाऱ्या भाविक व वारकऱ्यांना आपल्या वाहनास पथकरातून सूट मिळणेबाबतचा पास हवा असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खटला विभागामध्ये सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, पीयुसी, कर, परवाना, योग्यता प्रमाणपत्र आदी सर्व विधिग्राह्य कागदपत्रांसह अर्ज सादर करून स्टिकर्स/ पास प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहनही पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 

Read in English

Web Title: Ashadhi Wari: Exemption from road tax for vehicles of devotees going to Pandharpur for Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.