Ashahdi Wari: पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस

By नितीश गोवंडे | Published: June 17, 2023 04:28 PM2023-06-17T16:28:39+5:302023-06-17T16:29:10+5:30

स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे विभागातील १३ डेपोतून या जादा बस सोडण्यात येणार आहेत...

Ashahdi Wari 2023 pandharpu 300 extra bus from Pune ST for Ashahdi ekadashi | Ashahdi Wari: पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस

Ashahdi Wari: पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस

googlenewsNext

पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरसाठी पावणे तीनशे जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे विभागातील १३ डेपोतून या जादा बस सोडण्यात येणार आहेत.

पुणे शहर व जिल्ह्यातून आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे वारकऱ्यांची सोय व्हावी म्हणून एसटी महामंडळाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुणे विभागातून २७५ जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ते ३० जून दरम्यान या जादा बस चालवल्या जाणार आहेत. यासाठी मुंबई, रायगड, पालघर विभागातून जादा बस मागवण्यात आल्या आहेत.

२५ जून रोजी २४ जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर दररोज जादा बसची संख्या वाढवण्यात येणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी २७५ जादा बस सोडल्या जातील. शिवाजीनगर येथून २५ व स्वारगेट येथून ३० जादा बस राहणार आहेत. त्याबरोबरच बारामती २७, इंदापूर २८, सासवड २१, शिरूर येथून २२ जादा बस सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी एसटीच्या सेवेचा फायदा घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Ashahdi Wari 2023 pandharpu 300 extra bus from Pune ST for Ashahdi ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.