सरपंच परिषद खेड तालुकाध्यक्षपदी आशिष येळवंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:12 AM2021-09-11T04:12:35+5:302021-09-11T04:12:35+5:30
कुरुळी : सरपंच परिषद या राज्यस्तरीय संस्थेच्या वतीने सणसवाडी (शिरूर) या ठिकाणी खेड तालुक्यातील सरपंच परिषदेची कार्यकारिणी निवड करण्यात ...
कुरुळी : सरपंच परिषद या राज्यस्तरीय संस्थेच्या वतीने सणसवाडी (शिरूर) या ठिकाणी खेड तालुक्यातील सरपंच परिषदेची कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्षपदी निघोजे येथील आशिष येळवंडे यांची निवड झाली. नव्याने निवड झाल्यानंतर बोलताना स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंचांच्या मदतीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन आशिष येळवंडे यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रदेश प्रसिद्धी प्रमुख बापूसाहेब जगदाळे, सरपंच परिषद पुणे जिल्हा समन्वयक दीपक खैरे, पुणे जिल्हा समन्वयक सरपंच परिषद, मुंबईचे वसंत भसे, प्रदेश सरचिटणीस सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्राचे ॲड. विकास जाधव आणि प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्राचे दत्ता काकडे उपस्थित होते.
100921\20210910_172523.jpg
सरपंच परिषद खेड तालुकाध्यक्षपदी
आशिष येळवंडे यांची निवड