महाराष्ट्रातील पहिली अांतर साेसायटी अाशियाना करंडक एकांकिका स्पर्धा यंदा जानेवारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 08:39 PM2018-11-29T20:39:06+5:302018-11-29T20:57:00+5:30
महाराष्ट्रातील पहिली अांतर साेसायटी अाशियाना करंडक एकांकिका स्पर्धा यंदा जानेवारीत हाेणार अाहे. 30 साेसायट्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार असून प्रथम तीन सांघिक विजेत्यांना राेख पारिताेषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार अाहेत.
पुणे : महाराष्ट्रातील पहिली अांतर साेसायटी अाशियाना करंडक एकांकिका स्पर्धा यंदा जानेवारीत हाेणार अाहे. 30 साेसायट्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार असून प्रथम तीन सांघिक विजेत्यांना राेख पारिताेषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार अाहेत. विशेष म्हणजे अांतर साेसायटी हाेणारी अाशियाना करंडक एकांकिका स्पर्धा ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा अाहे.
2014 साली अाशियांना करंडकाच्या माध्यमातून एक अनाेखं पाऊल उचललं गेलं. सर्व लहानथाेरांना एकत्र अाणण्याच्या उद्देशाने अाशियांना करंडक अांतर साेसायटी एकांकिका स्पर्धा सुरु करण्यात अाली. सर्वांना कलेच्या माध्यमातून एकत्र अाणावं, त्या माध्यामतून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा अाणि त्यायाेगे दैनंदिन व्यवहारातल्या ताणतणांवापासून मुक्त करावं, या उद्देशाने रश्मिता शहापूरकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सुरु झाली. हा उपक्रम यशस्वीरित्या साकार करण्यासाठी प्रियांका वैद्य, प्रतिक्षा जाधव, पायल गाेडबाेले, वैशाली कन्नमवार यांचे माेलाचे सहकार्य लाभले अाहे. पहिल्या वर्षी 17 प्रवेशिका या स्पर्धेसाठी अाल्या. गेल्या वर्षी हा अाकडा 30 पर्यंत गेला. या स्पर्धेच्या प्राथमिक तयारीपासून संपूर्ण अायाेजन महिलाच करतात, हे या स्पर्धेचं अाणखी एक वैशिष्ट अाहे.
अनेक मान्यवरांनी काैतुक केलेल्या या अनाेख्या स्पर्धेमध्ये चार वर्षांपासून ते 75 वर्षांपर्यंतची मंडळी उत्साहाने सहभागी हाेतात. अापापल्या घरांमधून बाहेर पडून अापली कला सादर करण्यासाठी अाणि त्यांना प्राेत्याहन देण्यासाठी साेसायटींमधील मंडळी बाहेर पडू लागली अाहेत अाणि त्या निमित्ताने पुन्हा एकमेकांशी संवाद साधू लागली अाहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या अाठवड्यात चार दिवस हाेणाऱ्या या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या 30 सासाेयट्यांना या स्पर्धेत सहभाग दिला जाणार अाहे. स्पर्धेत वयाची मर्यादा नसल्यामुळे लहान मुलांच्या अाणि माेठ्यांच्या अशा दाेन्ही गटातल्या एकांकिका सादर केल्या जातील. स्पर्धेत सहभागी हाेणाऱ्या संघांसाठी मार्गदर्शन म्हणून अभिनय, दिग्दर्शन अाणि अावज या विषयांवर विशेष कार्यशाळाही अायाेजित केल्या जातात. 10 डिसेंबर पर्यंत या स्पर्धेत सहभागी हाेता येणार अाहे. स्पर्धेत सहभागी हाेण्यासाठी aashiyanakarandak@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधण्याचे अावहन अायाेजकांकडून करण्यात अाले अाहे.