अष्टविनायक महामार्गाच्या साईडपट्ट्यांना मातीमिश्रित मुरुमाचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:14 AM2021-08-21T04:14:25+5:302021-08-21T04:14:25+5:30

अष्टविनायक महामार्गाचे काम तीन टप्प्यांत होत असून, पाटस-दौंड, दौंड-सिद्धटेक व दौंड-पारगाव असे १७६ कोटींचे काम आहे. या कामासाठी दोन ...

Ashtavinayak highway sidewalks filled with mud | अष्टविनायक महामार्गाच्या साईडपट्ट्यांना मातीमिश्रित मुरुमाचा भराव

अष्टविनायक महामार्गाच्या साईडपट्ट्यांना मातीमिश्रित मुरुमाचा भराव

googlenewsNext

अष्टविनायक महामार्गाचे काम तीन टप्प्यांत होत असून, पाटस-दौंड, दौंड-सिद्धटेक व दौंड-पारगाव असे १७६ कोटींचे काम आहे. या कामासाठी दोन वर्षाचा कालावधी आहे. ज्या ठेकेदारांंनी काम घेतले आहे त्यांनी आठ वर्षे या रस्त्याची देखभाल करायची असून त्या ठेकेदाराला आठ वर्षांत हप्त्याहप्त्याने १७६ कोटी रुपये मिळणार आहेत. दरम्यान, अष्टविनायक महामार्गाचे काम सुरु असताना या रस्त्याच्या साईडपट्ट्या भरताना मातीमिश्रित मुरूमाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही दिवसांपूर्वीच शिरापूर येथे मातीमिश्रित साईडपट्ट्या तयार केल्यामुळे ट्रक रुतून बसला होता. ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही त्याचे त्याच पद्धतीने काम सुुरू ठेवले. शिवाय बांधकाम विभागाचे अधिकारीही कोणीही याकडे लक्ष देत नाही. या निकृष्ट कामामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याशिवाय या कामांसदर्भात ठेकेदाराकडून कोणत्याची प्रकारच्या सूचनांचे फलक लावले नाही. त्यामुळे हे काम किती रुपयांचे आहे, कोणाच्या माध्यमातून सुरु आहे. किती वर्षे चालणार याबाबत स्थानिक ग्रामस्थ अनभिज्ञ असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. एकूणच हा सर्व प्रकार गंभीर असून याकडे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

२० देऊळगावराजे

अष्टविनायक महामार्गालगत टाकण्यात आलेला मातीमिश्रित मुरुम.

Web Title: Ashtavinayak highway sidewalks filled with mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.