अष्टविनायक रस्त्याचे काम संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:15 AM2021-08-28T04:15:30+5:302021-08-28T04:15:30+5:30
--- वरवंड : वरवंड (ता. दौंड) दौंड तालुक्यात ठिकठिकाणी अष्टविनायक मार्गाचे काम चालू आहे. काही ठिकाणचे काम पूर्ण झाले ...
---
वरवंड : वरवंड (ता. दौंड) दौंड तालुक्यात ठिकठिकाणी अष्टविनायक मार्गाचे काम चालू आहे. काही ठिकाणचे काम पूर्ण झाले असले तरी बहुतांश ठिकाणी अतिशय संथ गतीने काम चालू असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. विशेषत: हातवळण गावच्या हद्दीतील या मार्गाचे काम संथ गतीने होत असल्यामुळे ग्रामस्थांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शिरूर-सातारा राज्य मार्गाला जोडणारा व दौंड बाजूकडे जाणारा रस्ता पारगाव-नानगाव-हातवळण-कानगाव-गार-नानविज-सोनवडी-दौंड दरम्यान अष्टविनायक मार्गाचे काम चालू होऊन दोन वर्षे पूर्ण होतील. मात्र, संथ गतीने चाललेल्या कामामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रवाशांबरोबर ग्रामस्थ ही नाराजी व्यक्त करत आहेत. या ठिकाणी रस्ता होणे बाकी आहे. यामुळे प्रवाशांना या रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनाचे अपघात होत आहेत. एखाद्याचा जीव गेल्यावर रस्ता करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. आतापर्यंत अनेक किरकोळ अपघात होत असल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात आले आहे. तसेच या रस्त्याचे काम जवळपास झाले दोन वर्षे झाले चालू आहे. यामुळे रस्त्याचा कामामुळे सतत धूळ उडणे, यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेती पिकांचे झालेले नुकसान संबंधित ठेकेदाराने भरून देण्याची मागणी जोर धरत आहे. अजून किती दिवस नुकसान सहन करावे अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कामावर पाहाणी करणारे संबंधित अधिकारी या कामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
---
चौकट
--
हातवळण गावाजवळ गेले दोन वर्षे झाले काम चालू आहे. कामाची गती इतकी संथ आहे की ते पाहता येथील काम संपालयाच वर्ष लागू शकेल, अशी शंका येते. अर्धवट रस्त्यांमुळे येथील शेतीचे मोठे नुकसान होत आहे. ग्रामस्थांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
-योगेश फडके, सरपंच
--
फोटो २७ वरवंड
फोटो ओळ - 1. रस्त्याचे काम रखडलेले आहे.