गणेशोत्सव काळात चार दिवसांत सायकलवर अष्टविनायक यात्रेचा संकल्प पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:12 AM2021-09-21T04:12:08+5:302021-09-21T04:12:08+5:30
यांमध्ये वेदांत काळभोर, तनिष्क काळभोर (लोणी काळभोर), स्वप्नील हरगुडे, अभिषेक गाडे, करण गाडे (वाघोली), विक्रम कदम (हडपसर) व निखिल ...
यांमध्ये वेदांत काळभोर, तनिष्क काळभोर (लोणी काळभोर), स्वप्नील हरगुडे, अभिषेक गाडे, करण गाडे (वाघोली), विक्रम कदम (हडपसर) व निखिल निकम (चंदननगर) या सात जणांचा समावेश होता. यांनी गणेशोत्सव काळात सायकलवर अष्टविनायक यात्रा करण्याचा संकल्प केला. बुधवार, दि. १५ सप्टेंबर रोजी पहाटे यात्रेला सुरुवात केली. थेऊर येथील चिंतामणीचे दर्शन घेऊन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड, पाली येथे शनिवार दि. १८ सप्टेंबर रोजी गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन युवकांची अष्टविनायक यात्रा संपन्न झाली.
अष्टविनायक यात्रा सायकलवर पूर्ण करीत असताना निसर्गाच्या सान्निध्याचा आस्वाद युवकांनी घेतला. भक्त निवास, मंदिर, नदीच्या कडेला असे तीन रात्री तीन मुक्काम या युवकांनी केला आहे. ही यात्रा सुखरूपरीत्या पूर्ण झाली. त्यामुळे युवकांचा आत्मविश्वास वाढला आहे. नागरिकांनी स्वास्थ्य बळकट राहण्यासाठी आठवड्यातून एक दिवस सायकल चालवावी, असे आवाहन केले आहे.
फोटो - सिद्धटेक येथील मंदिरासमोर सर्व सायकलस्वार.