‘अष्टेकर ज्वेलर्स विश्वास जपतील’
By admin | Published: April 21, 2015 02:57 AM2015-04-21T02:57:16+5:302015-04-21T02:57:16+5:30
बारामतीचे सोने महाराष्ट्रात त्याच्या चोखपणासाठी प्रसिद्ध आहे. चोखंदळ ग्राहकांच्या अपेक्षांवर कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स नक्की उतरतील. मालाची
बारामती : बारामतीचे सोने महाराष्ट्रात त्याच्या चोखपणासाठी प्रसिद्ध आहे. चोखंदळ ग्राहकांच्या अपेक्षांवर कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स नक्की उतरतील. मालाची गुणवत्ता, सचोटी, व्यवहारातील पारदर्शीपणा यामुळे ते ग्राहकांचा विश्वास कायम ठेवतील, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. बारामती शहरात कृष्णा राजाराम अष्टेकर यांच्या नूतन दालनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, ‘‘स्पर्धेच्या युगात व्यवसायासाठी महत्वाची असणारी गुणवत्ता अष्टेकर ज्वेलर्सने जपली आहे. ग्राहकाभिमुख सेवेच्या बळावर मागील ७५ वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. मात्र हे करत असताना त्यांनी आपल्या सेवेत स्थानिकांना संधी द्यावी, ’’़
यावेळी प्रास्ताविक करताना कृष्णाजी अष्टेकर यांनी ज्वेलर्सची माहिती दिली. आपल्या पुढच्या पिढीच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्यास तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी ‘बारामती अॅग्रो’चे अध्यक्ष राजेंद्र पवार, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, उपनगराध्यक्षा रेश्मा शिंदे, मुख्याधिकारी दीपक झिंझाड, बारामती बँकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, कृष्णा राजाराम अष्टेकरच्या राधिका अष्टेकर, अतुल अष्टेकर, अमोल अष्टेकर, विपुल अष्टेकर, शलाका अष्टेकर आदी उपस्थित होते.(वा. प्र.)