बैलगाडा सुरू करण्याबाबत गृहमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:15 AM2021-08-25T04:15:24+5:302021-08-25T04:15:24+5:30
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, मानसिंग पाचुंदकर, विश्वास कोहकडे तसेच अखिल भारतीय बैलगाडा ...
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, मानसिंग पाचुंदकर, विश्वास कोहकडे तसेच अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संदीप बोदगे, रामकृष्ण टाकळकर, बाळासाहेब आरुडे, कोल्हापूरचे आबासाहेब भोसले, पप्पू येवले आदी उपस्थित होते.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, सुप्रिम कोर्टाचा तिढा सुटल्याशिवाय आपणाला काहीही करता येणार नाही. बैलगाडा शर्यत सुरू झाली पाहिजे. हे जसे शेतकऱ्यांना वाटते तसेच ते आम्हालाही वाटते. शर्यतीला सर्व पक्षांचा तसेच राज्य व केंद्र शासनाचाही पाठिंबा आहे. याबाबत आता सुप्रिम कोर्टाची लवकरात लवकर तारीख घेऊन सुनावणी होण्यासाठी राज्याचे वकील सचिन पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. सुनावणीची तारीख लवकरच मिळेल. राज्य सरकारच्या वतीने सुप्रिम कोर्टात बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी याचिका दाखल करून चार नामांकित वकिलांची नेमणूक केली आहे. संरक्षित प्राण्यांच्या यादीतील बैलाचे नाव काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. संरक्षित प्राण्यांच्या यादीतील बैलाचे नाव वगळल्यास आपल्या बाजूने निकाल लागण्यास मदत होणार आहे. लवकर निकाल लागण्यास प्राधान्य देऊ, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या वेळी बाळासाहेब आरुडे, नीलेश पडवळ, रामभाऊ टाकळकर यांनी केले.
--