प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुनर्वसन मंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:10 AM2020-12-29T04:10:09+5:302020-12-29T04:10:09+5:30

यावेळी पानशेत धरण व वरसगाव धरण प्रकल्पग्रस्तांना शासन परिपत्रक क्र.आरपीए १०७१/४१/५८३/र-१ दि.०९/०५/१९७३ परिपत्रकामधील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्तांस जमीन वाटप करण्याचे निर्देशाची ...

Ask the Rehabilitation Minister to solve the problems of the project victims | प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुनर्वसन मंत्र्यांना साकडे

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुनर्वसन मंत्र्यांना साकडे

Next

यावेळी पानशेत धरण व वरसगाव धरण प्रकल्पग्रस्तांना शासन परिपत्रक क्र.आरपीए १०७१/४१/५८३/र-१ दि.०९/०५/१९७३ परिपत्रकामधील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्तांस जमीन वाटप करण्याचे निर्देशाची प्रशासनाकडून अंमल बजावणी होत नसलेबाबत तसेच पानशेत व वरसगाव धरण प्रकल्पामुळे विस्थापित प्रकल्पग्रस्तांना दौंड तालुक्यात वाटप जमिनी व भूखंडाचे ७/१२ वरील इतर हक्कातील नवीन शर्त शेरे कमी करणे, पुनर्वसित गावठाणात वाटप रहीवासी भुखंडामध्ये पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत. दौंड तालुक्यातील मा.जिल्हाधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन (जमीन) पुणे यांचे नावे असलेल्या जमिनीवरील अतिक्रमण काढणे या विषयावर चर्चा झाली. दौंड तालुक्यातील राजेगाव, मलठण, लोणारवाडी, दौंड, लिंगाळी, गोपाळवाडी, या महसुली गावात उजनी प्रकल्पग्रस्तांना पूर्वी पर्यायी जमीन व भूखंड वाटप केलेले असताना तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्तांना संपादित जमिनीचे बदल्यात सोलापूर येथे पर्यायी जमीन व भूखंड मागणी करणेस कळविले जात असल्याची बाब यावेळी पुनर्वसन मंत्री यांचे निदर्शनास आणून दिली. तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन दौंड तालुक्यातच प्राधान्याने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावे अशी मागणी ही पासलकर यांनी यावेळी केली.

यावेळी शिवसेना युवा सेना प्रमुख समिर भोईटे ,उपतालुका प्रमुख विजयसिंह चव्हाण ,शाखा प्रमुख दिपक भंडलकर आदि उपस्थित होते.

विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करताना महेश पासलकर

२८ केडगाव १

Web Title: Ask the Rehabilitation Minister to solve the problems of the project victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.