‘जेएसपीएम’कडून मागविला खुलासा

By admin | Published: December 29, 2014 01:07 AM2014-12-29T01:07:17+5:302014-12-29T01:12:10+5:30

शिक्षण शुल्क समितीने निर्धारित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त जयवंतराव शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम) संस्थेच्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून स्टेशनरी

Asked by JSPM to disclose | ‘जेएसपीएम’कडून मागविला खुलासा

‘जेएसपीएम’कडून मागविला खुलासा

Next

पुणे : शिक्षण शुल्क समितीने निर्धारित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त जयवंतराव शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम) संस्थेच्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून स्टेशनरी शुल्काच्या नावाखाली ८०० रुपये शुल्क आकारले. परंतु, महाविद्यालयांकडून आकारण्यात आलेले शुल्क बेकायदा असल्याची तक्रार विद्यापीठाला मिळाली होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनातर्फे जेएसपीएमला यासंदर्भातील खुलासा देण्याचे पत्र पाठविण्यात आले आहे.
जेएसपीएम संस्थेच्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य शुल्क आकारल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आंदोलन करण्यात आले. तसेच स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना यासंदर्भातील निवेदन दिले होते. त्यावर महाविद्यालयास योग्य निर्देश दिले जातील, असे आश्वासन गाडे यांनी दिले होते.(प्रतिनिधी)

Web Title: Asked by JSPM to disclose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.