साऊंड सिस्टिम मोठ्याने लावण्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:56+5:302021-04-27T04:11:56+5:30

पुणे : मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असताना साऊंड सिस्टिमचा आवाज मोठा करून व्यत्यय आणल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून चौघांनी शेजारी ...

Asking for a loud sound system | साऊंड सिस्टिम मोठ्याने लावण्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार

साऊंड सिस्टिम मोठ्याने लावण्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार

Next

पुणे : मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असताना साऊंड सिस्टिमचा आवाज मोठा करून व्यत्यय आणल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून चौघांनी शेजारी राहणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला.

याप्रकरणी महादेव अडसूळ (वय ३६, रा. शांतीनगर वसाहत, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी विकास पांडव (वय ३५), दत्ता पांडव (वय ३०), ओंकार पांडव (वय १९) आणि आकाश पवार (वय २५, सर्व रा. शांतीनगर वसाहत, धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शांतीनगर वसाहतीत रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला.

फिर्यादी व आरोपी एकाच वसाहतीत राहतात. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने अडसूळ यांच्या मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या घरातील टीव्ही व साऊंड सिस्टिमचा आवाज वाढवला. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात व्यत्यय येत होता. त्याचा फिर्यादी यांनी जाब विचारल्याने ६ महिन्यांपूर्वी त्यांच्यात भांडणे झाली होती. त्या वेळी भांडणे मिटविण्यात आली. तरी त्याचा राग मनात धरून आरोपींनी रविवारी रात्री अडसूळ यांना शिवीगाळ करून मारहाण केली. कोयत्याने त्यांच्या डोक्यावर, हातावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्याबरोबरच पत्नी, मावशी, मावसभाऊ यांनाही मारहाण केली. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Asking for a loud sound system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.