वडगावशेरीत शासकिय,खाजगी रूग्णालयात बेड मिळवताना रुग्णांची दमछाक, कोरोना रूग्णवाढीचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 07:28 PM2021-04-04T19:28:35+5:302021-04-04T19:29:52+5:30
कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने रुग्णालयात बेडच उपलब्ध नाहीत
विशाल दरगुडे
पुणे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्याचप्रमाणे वडगावशेरी, खराडी, चंदननगर, विमाननगर ,लोहगाव या परिसरात रुग्णसंख्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. सरकारी रुग्णालयात जागा नसल्याने नागरिक खासगी रुग्णालयात बेड शोधण्यासाठी धडपड करत आहेत. पण वडगावशेरीत शासकिय,खाजगी रूग्णालयात बेड मिळविताना रुग्णांची दमछाक होंतानाचे चित्र दिसून आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून वडगावशेरीत संख्याही वाढत आहे. पैशापेक्षा जीव महत्त्वाचा असल्याने बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात बेड शोधण्यासाठी धडपड करीत आहेत. या खाजगी रुग्णालयात उपलब्ध असल्याचे जरी महापालिका सांगत असले तरी तिथे तो मिळवताना सामान्य रुग्णांची दमछाक होत आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरोना चा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. वडगावशेरी, खराडी,चंदननगर, विमाननगर ,लोहगाव या परिसरात रुग्ण संख्या दररोज सरासरी ५००हुन अधिकने वाढत आहे. ती पुणे शहरातील इतर भागांच्या तुलनेत अव्वल असून सातत्याने वाढ होताना दिसत आहे . ही वाढीची संख्या भीतीदायक आहे. कोरोणा ग्रस्तांच्या उपचारासाठी ऐकीकडे महापालिका विविध यंत्रणा कार्यान्वित आहे. परंतु जम्बो हॉस्पिटल ,ससून या ठिकाणे बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात पळपळ करायला लागत आहे. मात्र नामांकित खासगी रुग्णालयात कोविडचे बेड सहजरीत्या उपलब्ध होत नाही .