ओपन ग्रॅण्डमास्टर होण्याची ‘आकांक्षा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:52 AM2018-04-14T00:52:33+5:302018-04-14T00:52:33+5:30

देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांना आपल्या आक्रमक खेळाने चेकमेट करणारी पुण्याची आकांक्षा हगवणे हिचे पुढील लक्ष्य ओपन ग्रॅण्डमास्टरचा किताब पटकाविण्याचे आहे.

Aspiration to be an open Grandmaster! | ओपन ग्रॅण्डमास्टर होण्याची ‘आकांक्षा’!

ओपन ग्रॅण्डमास्टर होण्याची ‘आकांक्षा’!

Next

पुणे : देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांना आपल्या आक्रमक खेळाने चेकमेट करणारी पुण्याची आकांक्षा हगवणे हिचे पुढील लक्ष्य ओपन ग्रॅण्डमास्टरचा किताब पटकाविण्याचे आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती तिने दिली.
आकांक्षा ही क्रीडाक्षेत्रात ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८’ पुरस्काराची मानकरी ठरली. त्यानंतर तिने ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी तिचे वडील श्रीनाथ हगवणे उपस्थित होते.
बुद्धिबळाच्या प्रवासाविषयी बोलताना आकांक्षा म्हणाली, ‘‘मी लहानपणी रोप मल्लखांब खेळायचे. मात्र, वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळाचा क्लास लावला होता. मात्र, तो केवळ सायंकाळीच असायचा. त्यामुळे मग रोप मल्लखांबाऐवजी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून बुद्धिबळ हेच माझे क्षेत्र झाले आहे. आता मला ग्रॅण्डमास्टर व्हायचे असून, त्यासाठी तयारी सुरू आहे. बुद्धिबळातील एकाग्रतेचा फायदा मला अभ्यास करताना झाला. खेळामुळे वर्षभर शालेय अभ्यासक्रमाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते. मात्र, परीक्षेच्या दोन महिने आधी अभ्यास करूनही दहावीला ८७ टक्के गुण मिळविता आले.
>‘चौसष्ट घरांची राणी’
‘चौसष्ट घरांची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या
आकांक्षा हगवणे हिने २०१५ मध्ये आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत
१६ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये २ सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावत ‘वुमन फिडे मास्टर’ हा किताब पटकावला होता.
२०१५ आणि २०१६ अशी सलग २ वर्षे तिने राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली.
आकांक्षाच्या नावावर १६ वर्षांखालील जागतिक स्पर्धेचे जेतेपदही आहे.
याशिवाय तिने ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ हा किताबदेखील
पटकावला आहे.

Web Title: Aspiration to be an open Grandmaster!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.