शिवसैनिकांचा या नेत्याच्या पुतण्यांवर प्राणघातक हल्ला

By Admin | Published: March 1, 2017 11:54 AM2017-03-01T11:54:35+5:302017-03-01T12:01:21+5:30

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांच्या दोन पुतण्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

The assassination of the leader of the Shiv Sainik leaders is a deadly attack | शिवसैनिकांचा या नेत्याच्या पुतण्यांवर प्राणघातक हल्ला

शिवसैनिकांचा या नेत्याच्या पुतण्यांवर प्राणघातक हल्ला

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

लोणावळा, दि. 1-  स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांच्या दोन पुतण्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे.  नितीन साळवे व प्रवीण साळवे अशी रमेश साळवे यांच्या पुतण्यांची नावे आहेत. या घटनेत नितीन साळवे यांच्या डोक्याला मार लागला आहे. 
 
नितीन साळवे हे  मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक असून, प्रविण साळवे हे कुसगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत.  या दोघांवर लोणावळ्याजवळील ओळकाईवाडी चौकात मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला. 
 
याप्रकरणी नितीन साळवे यांच्या फिर्यादीवरुन लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यामध्ये शिवसेनेच्या वतीने उषा संजय घोंगे या उमेदवार होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजश्री राऊत निवडणुकीच्या रिंगणात होत्या.  
 
या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाने राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा दिला होता व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे हे प्रचारप्रमुख होते. या निवडणुकीत राजश्री राऊत  विजयी झाल्या व शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. हा राग मनात धरुन शिवसेनेचे रवी घोंगे व गबळू ठोंबरे हे रमेश साळवे यांच्या सोबत ओळकाईवाडी चौकात वाद घालत होते. 
 
ही माहिती मिळताच साळवे यांचे पुतणे नितीन व प्रविण हे चौकात आले असता कुसगाव ग्रामपंचायत सदस्य गबळू ठोंबरे, रवी घोंगे, किसन ठोंबरे, बाळू काळे, अमोल ठोंबरे, बाळा ठोंबरे, अजित केदारी, मनोज केदारी, विजय घोंगे व इतर यांनी काठ्या, चाकूने वार करत मारहाण केली. तर गबळू ठोंबरे यांनी त्यांच्या हातातील तलवारीने नितीन साळवे यांच्या डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर अन्य जण प्रविण यांना मारहाण करत होते.  
 
याप्रकरणी रमेश साळवे यांनी शिवीगाळ करत हल्ला केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
 

Web Title: The assassination of the leader of the Shiv Sainik leaders is a deadly attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.