लोणी काळभोरमध्ये पूर्ववैमनस्यातून अट्टल गुन्हेगारासह साथीदारावर कोयत्याने हल्ला, गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 03:20 PM2024-05-16T15:20:05+5:302024-05-16T17:08:51+5:30

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत...

Assault on an accomplice with an adamant criminal out of animosity; A case has been registered at Loni Kalbhor Police Station | लोणी काळभोरमध्ये पूर्ववैमनस्यातून अट्टल गुन्हेगारासह साथीदारावर कोयत्याने हल्ला, गुन्हा दाखल 

लोणी काळभोरमध्ये पूर्ववैमनस्यातून अट्टल गुन्हेगारासह साथीदारावर कोयत्याने हल्ला, गुन्हा दाखल 

लोणी काळभोर (पुणे) : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन कवडीपाट येथील कुख्यात गुन्हेगार व त्याच्या साथीदारावर बुधवारी (दि. १५) रात्री लोणी काळभोर गावात पालघन व लोखंडी हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राज रविंद्र पवार (वय-२५, रा. कवडीपाट गुजरवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) व सौरभ सुनिल गायकवाड अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर आकाश भाले (रा. गारुडी वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे), सदाम अन्सारी (रा. इंदिरानगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे), सागर कारंडे, किरण चव्हाण, ऑगी उर्फ यश जैन (तिघेही रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर यामधील आरोपी आकाश भाले याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राज पवार याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राज पवार व सौरभ गायकवाड हे दुचाकीवरून त्यांचा मित्र आकाश भाले याला भेटण्यासाठी लोणी काळभोर येथील गारुडीवस्ती येथे आले होते. तेव्हा आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून संगनमत करत राज पवारच्या पोटात पालघन मारली. तसेच त्याचा मित्र सौरभ गायकवाड याच्यावर लोखंडी कोयत्याने सपासप वार केले. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर ते आपला जीव वाचवण्याचे उद्देशाने तेथून पळून गेले. 

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी तत्काळ या हल्ल्यातील एक आरोपी आकाश भाले याला बेड्या ठोकल्या आहेत. तर उर्वरित चार आरोपी गुन्हा केल्यापासून फरार झाले आहेत. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.

Web Title: Assault on an accomplice with an adamant criminal out of animosity; A case has been registered at Loni Kalbhor Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.