पुण्यात जात पडताळणी समिती उपायुक्ताच्या घर झडतीमध्ये तब्ब्ल '२ कोटींची मालमत्ता'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 03:54 PM2021-10-17T15:54:44+5:302021-10-17T16:27:12+5:30

जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच मागून प्रत्यक्षात १ लाख ९० हजार रुपये स्वीकारताना (Anti Corruption Bureau) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्ताला रंगेहाथ पकडले.

Assets worth Rs 2 crore in house raid of Deputy Commissioner of Caste Verification Committee in Pune | पुण्यात जात पडताळणी समिती उपायुक्ताच्या घर झडतीमध्ये तब्ब्ल '२ कोटींची मालमत्ता'

पुण्यात जात पडताळणी समिती उपायुक्ताच्या घर झडतीमध्ये तब्ब्ल '२ कोटींची मालमत्ता'

Next
ठळक मुद्दे८ लाखांची मागणी करुन १ लाख ९० हजार रुपये घेताना पकडले

पुणे : जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच मागून प्रत्यक्षात १ लाख ९० हजार रुपये स्वीकारताना (Anti Corruption Bureau) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्ताला आज सकाळी रंगेहाथ पकडले होते. नितीन चंद्रकांत ढगे (वय ४०) असे या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्ताचे नाव आहे. वानवडी येथील ढगे यांच्या निवासस्थानाजवळ शनिवारी रात्री रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानाच्या घर झडतीमध्ये १ कोटी २८ लाख ४९ हजारांच्या मालत्तांच्या कागदपत्रांसहित २ कोटी ८१ लाख ८९ हजार इतक्या किंमतीची मालमत्ता मिळून आली आहे. 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नितीन ढगे हे उपायुक्त तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आहेत. तक्रारदार यांच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. ते प्रमाणपत्र वैध करण्याकरीता ढगे याने ८ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात ढगे यांनी तडजोड करुन २ लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदार यांना ढगे यांनी पैसे देण्यासाठी वानवडीतील आपल्या निवासस्थानाजवळ बोलाविले होते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना ढगे यांना पकडण्यात आले. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Assets worth Rs 2 crore in house raid of Deputy Commissioner of Caste Verification Committee in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.