रेल्वे रुग्णालयाला ‘एस्मा’ची मदत, कोरोना रुग्णांसाठी उपकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:10 AM2021-05-24T04:10:26+5:302021-05-24T04:10:26+5:30
पुणे : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स एसोसिएशन (एस्मा) च्या वतीने पुणे रेल्वे हॉस्पिटलला चार लाख रुपये किमतीची वैद्यकीय उपकरणे ...
पुणे : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स एसोसिएशन (एस्मा) च्या वतीने पुणे रेल्वे हॉस्पिटलला चार लाख रुपये किमतीची वैद्यकीय उपकरणे भेट देण्यात आली.
एस्माच्या पुणे विभागाच्या वतीने रेल्वे हॉस्पिटलला कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी
एक व्हेंटीलेटर, बेड मॉनिटर, ऑक्सिजन क्रिएटर्ससारखी उपकरणे भेट देण्यात आली. यापूर्वी देखील एस्माच्या वतीने वेळोवेळी मदत करण्यात आली आहे. कोरोनाच्या पाहिल्या लाटेत भारतीय रेल्वेतील सर्व स्टेशन मास्टर्स यांनी आपल्या तीन दिवसांचे वेतन केंद्र सरकारला मदतनिधी म्हणून दिले होते. तसेच देशातल्या विविध रेल्वे स्थानकावर मास्क, सॅनिटायझर, थर्मामीटर, ऑक्सिमीटर देखील वितरित करण्यात आले. या वेळी एस्माचे
एस. के. मिश्रा,
गंगाधर साहू, कृष्ण मुरारी, अमित कुमार, शकिल इनामदार, दिनेश कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
230521\save_20210523_191533.jpg
===Caption===
एस्मा या संघटनेच्या वतीने पुण्यातील रेल्वे हॉस्पिटला कोरोना रुग्णांनाकरिता वैद्यकीय उपकरणे भेट देण्यात आली. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.