सायबर प्रशिक्षणासाठी पोलीस घेणार खासगी संस्थांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:07+5:30

खून, दरोडे, चोऱ्या, वाहनचोऱ्या या गुन्ह्यांपेक्षा गेल्या दोन वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ

Assistance of private organizations to get police for cyber training | सायबर प्रशिक्षणासाठी पोलीस घेणार खासगी संस्थांची मदत

सायबर प्रशिक्षणासाठी पोलीस घेणार खासगी संस्थांची मदत

Next
ठळक मुद्देप्रत्येक पोलीस ठाण्यातील १० जणांना करणार प्रशिक्षितएशियन स्कुल ऑफ सायबर लॉ व मुंबईतील एका संस्थेची मदत घेणार

पुणे : खून, दरोडे, चोऱ्या, वाहनचोऱ्या या गुन्ह्यांपेक्षा गेल्या दोन वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र, अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक प्रशिक्षित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याप्रमाणात उपलब्ध नाही. तसेच सायबर पोलीस ठाण्यामध्ये आणखी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षित करण्यासाठी पुणे पोलीस खासगी संस्थांची मदत घेणार आहे. 

पुणे शहरात  २०१९ या वर्षात असे पारंपारिक ८ हजार ६७७ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्याचवेळी २०१९ मध्ये सायबर पोलिसांकडे तब्बल ७ हजार ९७२ फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. नव्या वर्षातही सायबर गुन्ह्यांमधील तक्रारीचा ओघ असाच कायम आहे. सायबर पोलीस ठाण्यांमध्ये मर्यादित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. हे गुन्हे खूप तांत्रिक आणि किचकट असतात. याशिवाय फसवणुक करणारे हे दुसºया शहरातील किंबहुना परराज्यातील असतात. या व्यवहारात संबंधित तक्रारदाराच्या खात्यातून ट्रान्सफर झालेल्या बँकेच्या शाखेची माहिती मिळविणे, त्या शाखेशी संपर्क साधून संबंधित खातेधारकाची माहिती मिळविणे, यासाठी अनेक दिवस जातात़ शिवाय दुसºया शहरातील, परराज्यातील अशा बँकांच्या शाखांकडून मिळणाऱ्या माहितीवर पुढील तपास अवलंबून असतो़ बºयाचदा सायबर चोरटे हे एका खात्यातून दुसऱ्या व दुसऱ्या खात्यातून तिसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करीत असतात. जेणे करुन हा पैसा शेवटी कोणाकडे गेला हे समजू नये. त्यामुळे याच्या तपासाला बराच वेळ लागतो. त्यामुळे अनेकदा तक्रारदाराची तक्रार दाखल झाल्यानंतरही प्रत्यक्ष त्यावर काम सुरु करण्यामध्ये काही दिवस निघून गेलेले दिसून येतात. याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिसवे यांनी सांगितले की, सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्याचवेळी सायबर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यास मर्यादा आहे. त्यामुळे आम्ही आता प्रत्येक पोलीस ठाण्यातील किमान १० अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षित करणार आहोत. त्यासाठी एशियन स्कुल ऑफ सायबर लॉ व मुंबईतील एका संस्थेची मदत घेणार आहोत. या संस्थांचे सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तसेच इंटरनेट इव्हेट्रिगेशन स्पेशालिस्ट यासारखे कोर्सेस आहेत. हे कोर्सेस पोलीस अधिकारी, कर्मचारी करतील. त्याची फी पोलीस दलाकडून भरली जाईल़, असे प्रशिक्षित झालेले अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाणे पातळीवरच त्यांच्याकडे आलेल्या सायबर गुन्ह्यांचा तपास करतील. त्यांना तांत्रिक सहाय्य सायबर पोलीस ठाण्यातून मिळेल, असे गुन्हे सायबर पोलीस ठाण्याकडे येणार नाहीत. सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक अ‍ॅपलिकेशन तयार करण्याचा आम्ही विचार करीत आहोत. जसे एखादा फॉर्म भरताना तुम्ही प्रत्येक स्टेप पूर्ण केल्यावर पुढे जाता येत तशाच पद्धतीचा वापर करता येतो, हे पहात आहोत, असे त्यांनी सांगितले.

.............

सायबर गुन्ह्यांचा तपास कसा करावा याचे प्रशिक्षण देण्यासाठी खासगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी पोलीस ठाणे पातळीवरच या गुन्ह्यांचा प्राथमिक तपास करतील. त्यामुळे सायबर पोलीस ठाण्यावरील भार कमी होण्यास मदत होईल. डॉ. रवींद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त, पुणे.

Web Title: Assistance of private organizations to get police for cyber training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.