पूरग्रस्त भागातील नागरिकांना राव-लक्ष्मी ट्रस्टकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:14 AM2021-08-12T04:14:43+5:302021-08-12T04:14:43+5:30

आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद ...

Assistance from Rao-Lakshmi Trust to flood affected citizens | पूरग्रस्त भागातील नागरिकांना राव-लक्ष्मी ट्रस्टकडून मदत

पूरग्रस्त भागातील नागरिकांना राव-लक्ष्मी ट्रस्टकडून मदत

Next

आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मांडवगण फराटा येथील ग्रामस्थांनी कोल्हापूर, सांगली रत्नागिरी या भागातील पुरग्रस्तांसाठी १० क्विंटल गहू, साखर, तांदूळ तसेच एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये मदत केली. ग्रामस्थांच्या वतीने सुजाता पवार यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली. या वेळी पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, पोलीस पाटील बाबा पाटील फराटे, दत्तात्रय फराटे, सरपंच शिवाजी कदम, संभाजी फराटे, मनीषा सोनवणे, शरद चकोर, राजेंद्र जगताप उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक :१० रांजणगाव सांडस मांडवगण फराटा मदत

फोटो ओळी : पूरग्रस्तांसाठी मदतीचा धनादेश सुजाता पवार यांच्याकडे सुपूर्द करताना मांडवगण फराटा ग्रामस्थ.

100821\10pun_9_10082021_6.jpg

फोटो क्रमांक :१० रांजणगाव सांडस मांडवगण फराटा मदत  फोटो ओळी : पूरग्रस्तांसाठी मदतीतीचा धनादेश सुजाता पवार यांच्या कडे सुपूर्द करताना मांडवगण फराटा ग्रामस्थ.

Web Title: Assistance from Rao-Lakshmi Trust to flood affected citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.