सहायक आयुक्तांच्या श्वानाचा १२ तासांत लागला तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:11 AM2021-02-07T04:11:56+5:302021-02-07T04:11:56+5:30

पुणे : शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त वियज चौधरी यांचे अमेरिकन जातीचे ६० हजार रुपये किमतीचे श्वान चाेरट्यांनी ...

Assistant Commissioner's dog was investigated within 12 hours | सहायक आयुक्तांच्या श्वानाचा १२ तासांत लागला तपास

सहायक आयुक्तांच्या श्वानाचा १२ तासांत लागला तपास

Next

पुणे : शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त वियज चौधरी यांचे अमेरिकन जातीचे ६० हजार रुपये किमतीचे श्वान चाेरट्यांनी पळवून नेले होते. लष्कर पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत चोरट्यांना पकडून श्वान त्यांच्या ताब्यात दिले. चोरट्यांनी हे श्वान हडपसर येथील एकाला विकले होते.

सहायक आयुक्त विजय चौधरी हे लष्कर पोलीस ठाण्याच्या परिसरात शासकीय निवासस्थानी राहतात. त्यांचे पाळीव श्वान घराबाहेर आले असताना दुचाकीवरील चोरट्यांनी ते पळवून नेले.

श्वान घरात नसल्याचे चौधरी यांच्या घरातील सदस्यांना समजले. त्यानंतर त्यानी हा सर्व प्रकार लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम यांच्या कानावर घातला. पोलीस अधिकारी यांचाच श्वानाची चोरी झाला असल्याने याबाबत वेगळी चर्चा होऊ शकते यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राऊत व उपनिरीक्षक महाडीक यांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करून चोरट्यांचा माग कढला.

त्यावेळी हवालदार चव्हाण यांना श्वान हडपसर येथे असल्याची माहिती मिळाली त्यामुळे तत्काळ त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतले व त्याला सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या पत्नीचे ताब्यात दिले.

Web Title: Assistant Commissioner's dog was investigated within 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.