वाहनांना सोडण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 08:13 PM2020-05-02T20:13:49+5:302020-05-02T20:14:37+5:30

लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर संशय आल्याने रोकड टेबलावर फेकून पुण्याच्या दिशेने निघून पळून गेले होते.

Assistant police inspector police custody for accepting Rs 15,000 bribe to release vehicles | वाहनांना सोडण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास कोठडी

वाहनांना सोडण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास कोठडी

Next
ठळक मुद्देउर्से टोलनाका परिसरात बुधवारी (दि. 29) रात्री घडली ही घटना

पुणे : द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या दोन वाहनांना सोडण्यासाठी तडजोडी अंती १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकास न्यायालयाने 3 मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली. सत्यजित रामचंंद्र अधटराव असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र रामजित यादव (वय ४१) या व्यक्तीने लाचलुचपत विभाकडे तक्रार दिली होती.
उर्से टोलनाका परिसरात बुधवारी (दि. 29) रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. यादव हे त्यांच्या गाडीतून पवनचक्कीचे पाते घेऊन चेन्नईहून राजकोटकडे जात असताना अधटराव यांनी यादव व त्यांचे सहकारी यांची दोन वाहने टोलनाक्यावर अडवून ठेवली. ही दोन्ही वाहने लॉकडाऊन झाल्यानंतर (३ मे)सोडू असे अधटराव याने यादव यांना सांगितले. दोन्ही गाड्या लगेच सोडायच्या असतील तर प्रत्येक गाडीचे १० हजार असे एकूण २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान, याबाबत यादव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
अधटराव याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे ध्वनीमुद्रीत संभाषणातून स्पष्ट झाले आहे. तसेच, लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्याला संशय आल्याने लाचेची रोकड टेबलावर फेकून चारचाकीतून पुण्याच्या दिशेने निघून गेले होते. याप्रकरणी त्यांना अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणात महामार्ग सुरक्षा पथकाचे इतर अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग आहे का या दृष्टीने तपास करायचा आहे. तसेच, गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांच्या न्यायालयाने ती मान्य केली.

Web Title: Assistant police inspector police custody for accepting Rs 15,000 bribe to release vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.