ज्योतिष शास्त्र हे मार्गदर्शक - भारत देसडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 03:55 AM2017-08-21T03:55:43+5:302017-08-21T03:55:43+5:30
ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. आपल्या भविष्याचे सर्वांनाच आकर्षण असल्याने ही गरज भागविण्यासाठी सर्व वर्तमानपत्रांसह वृत्तवाहिन्यांवर राशीभविष्य देण्यात येते. ज्योतिषशास्त्राचे वैज्ञानिकदृष्ट्या स्वत:चे वेगळे महत्त्व असल्याचे प्रतिपादन उद्योजक भारत देसडला यांनी केले.
पुणे : ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. आपल्या भविष्याचे सर्वांनाच आकर्षण असल्याने ही गरज भागविण्यासाठी सर्व वर्तमानपत्रांसह वृत्तवाहिन्यांवर राशीभविष्य देण्यात येते. ज्योतिषशास्त्राचे वैज्ञानिकदृष्ट्या स्वत:चे वेगळे महत्त्व असल्याचे प्रतिपादन उद्योजक भारत देसडला यांनी केले.
भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अॅकॅडमी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या ३५ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी हस्तमुद्रिकातज्ज्ञ प्रतिभा मोडक, पं. राजीव शर्मा, बी. जी. पाचार्णे, डॉ. दिलीपकुमार, चंद्रकांत शेवाळे, पुष्पलता शेवाळे, नवीनकुमार शहा, उल्हास पाटकर आदी उपस्थित होते. या वेळी ज्योतिषविषयक १३ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. महिला सत्रामध्ये डॉ. प्रीती दवे, शाल्मिका पुंड, अंजू अगरवाल यांनी ज्योतिषविद्येविषयी माहिती दिली.
पं. गणेश दुबे, पं. विजय जकातदार, डॉ. सुनंदा राठी, पं. सदाशिव शाळीग्राम यांनी सत्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. या अधिवेशनाला देशाच्या विविध शहरांमधून ६०० च्यावर प्रतिनिधींनी हजेरी लावली. डॉ. अंजली ठोंबरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अरुंधती पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. शुभांगी काटे यांनी आभार मानले.
तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
विविध विषयांवर अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पंजाबमधील मोगा येथील पं. अक्षय शर्मा यांनी विवाहज्योतिष, दिल्लीतील अशोक भाटी यांनी अंकज्योतिष, चंदीगडचे राजेश वशिष्ठ यांनी वास्तू आणि ऊर्जा, अहमदाबादहून आलेल्या डॉ. त्रिशला शेठ यांनी वृक्ष आणि वास्तू, पं. मौलेशभाई पटेल यांनी तंत्रशास्त्र व दुर्गाप्रसाद शास्त्री यांनी मंत्रशास्त्र, सोलापूरचे पं. प्रदीप जाधव यांनी श्रीविद्या, दिल्लीचे पं. पद्म उपाध्याय यांनी अध्यात्म ज्योतिष याविषयी मार्गदर्शन केले.