या २२ वर्षीय तरुणीला वेड लागले ग्रह ताऱ्यांचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 08:25 PM2018-05-22T20:25:39+5:302018-05-22T20:25:39+5:30

ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासाच्या ध्येयाने नव्हे वेडाने झपाटलेल्या २२वर्षीय श्वेता कुलकर्णी या तरुणीची देशातल्या १०० महिलांमध्ये निवड झाली असून लवकरच ती खगोलशास्त्र विषयावर ऑनलाईन वेबपोर्टल सुरु करत आहे. या पोर्टलद्वारे केवळ माहिती न देता तिथे भेट देणाऱ्यांना खगोलशास्त्र विषयक अभ्यासक्रमही शिकवले जाणार आहेत. 

astronaut Shweta Kulkarni's big achievement | या २२ वर्षीय तरुणीला वेड लागले ग्रह ताऱ्यांचे 

या २२ वर्षीय तरुणीला वेड लागले ग्रह ताऱ्यांचे 

Next

 

पुणे :  ध्येयानेे झपाटलेल्या, वेड्या झालेल्या माणसाला आयुष्यात यश मिळतेच असे म्हटले जाते. अशाच एका ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासाच्या ध्येयाने नव्हे वेडाने झपाटलेल्या २२वर्षीय श्वेता कुलकर्णी या तरुणीची देशातल्या १०० महिलांमध्ये निवड झाली असून लवकरच ती खगोलशास्त्र विषयावर ऑनलाईन वेबपोर्टल सुरु करत आहे. या पोर्टलद्वारे केवळ माहिती न देता तिथे भेट देणाऱ्यांना खगोलशास्त्र विषयक  अभ्यासक्रमही शिकवले जाणार आहेत. 

       श्वेता अक्षरनंदन शाळेची विद्यार्थींनी.शालेय वयात वाचन सुरु असताना तिला आईस्टाईन, न्यूटन, कल्पना चावला यांनी भुरळ घातली. या विषयातला तिचा रस बघून घरातल्या व्यक्तींनीही तिला प्रोत्साहन दिले. १२वी पूर्ण झाल्यावर तिने याच विषयात उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशात एम एस्सी इन ऍस्ट्रो फीजिक्स वगळता एकही अभ्यासक्रम तिला आढळला नाही. यातही भौतिकशास्त्र अर्थात फिजिक्स शिकण्याची सक्ती आहे. अखेर तिने बाहेरून यु के'तील एका विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे तिचे शिक्षण बाहेरून पदवीचे शिक्षण सुरु आहे. 

   हे सर्व सुरु असताना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात आयआयएम यांनी घेतलेल्या ऑनलाईन स्पर्धेत तिने मांडलेली संकल्पना स्पर्धकांच्या पसंतीस उतरली आणि तिला तब्बल ७००० महिलांमधून निवडण्यात आले. यासाठी निवडण्यात आलेली ती पुण्यातील एकमेव स्पर्धक असून तिला तिची संकल्पना उतरवण्यासाठी आयआयएमतर्फे मदत सुरु झाली आहे. त्यामुळे तिच्या खगोलशास्त्र विषयावरील वेब पोर्टल बनवण्याच्या कामाला वेग आला आहे. या पोर्टलवरून खगोलशास्त्राशी संबंधित अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहेत. त्या विषयी श्वेता हिने माहिती देताना हे अभ्यासक्रम शिकण्यासाठी वयोमर्यादा नसल्याचे सांगितले. यातील काही अभ्यासक्रम विनामूल्यही असणार असल्याचे तिने स्पष्ट केले. याशिवाय www. udemy.com या वेबसाईटवर त्यांचे दोन अभ्यासक्रम सुरूही झाले आहेत. या कामात तिच्यासोबत निमिष आगे, सिद्धार्थ मेहंदळे, अनिरुद्ध देशपांडे आणि इतर खगोलप्रेमी मदत करतात. यामुळे भारतात खगोलशास्त्राचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला निराश होण्याची वेळ येणार नसून शास्त्रीयदृष्टीने अभ्यास करता येईल असा विश्वास श्वेता हिने व्यक्त केला. 

Web Title: astronaut Shweta Kulkarni's big achievement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.