खगोलप्रेमींनी अनुभवली गुरू ,शनीची दुर्मिळ युती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:10 AM2020-12-22T04:10:38+5:302020-12-22T04:10:38+5:30
गुरू व शनी या दोन ग्रहांची युती सध्या सुरू असून या ग्रहांमधील अंतर चारशे वर्षात सर्वात कमी झाले.त्यामुळे सोमवारी ...
गुरू व शनी या दोन ग्रहांची युती सध्या सुरू असून या ग्रहांमधील अंतर चारशे वर्षात सर्वात कमी झाले.त्यामुळे सोमवारी दृश्य पहाण्यासाठी ज्योतिर्विद्या परिसंस्थेने खगोलप्रेमींना खगोलप्रेमींसाठी आवश्यक व्यवस्था करून दिली होती. एका दिवसाला २०० खगोलप्रेमींना हा दुर्मिळ योग पाहता येईल,असे नियोजन संस्थेतर्फे करण्यात आले होते. मंगळवारी २०० जगांना ही युती पाहता येणार आहे. पुण्यातून सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून रात्री साडे आठ वाजेपर्यंत गुरू व शनिची युती दिसणार होती. मात्र, सायंकाळी साडेसात वाजेनंतर आकाशात ढग आल्याने ही युती पाहणे शक्य झाले नाही.
खगोल अभ्यास डॉ. प्रकाश तुपे म्हणाले, दर वीस वर्षांनी या दोन ग्रहांची युती होते. यावेळी पृथ्वी, गुरू आणि शनी यांच्यातील अंतर कमी असते. मागील वेळी या ग्रहांमधील अंतर १.२अंश होते तर यंदा हे अंतर ०.१ पर्यंत कमी झाले आहे. २०८० मध्ये पुन्हा अशाच प्रकारची युती पहायला मिळेल.त्याचप्रमाणे ७५४१ या वर्षी गुरू हा शनीच्या वरून जाईल.
ज्योतिर्विद्या परिसंस्थेसह खगोल विश्व, या संस्थेने पुसाणे या गावी आणि फेसबुक पेजवर या दोन्ही ग्रहांची युती पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.अनेक खगोल प्रेमींनी ही युती आपल्या कॅमेरामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला.खगोल प्रेमींनी पाहिली