बारामतीत दहीहंडीला डीजेच्या दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली; ११ डीजे मालक चालकांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 06:35 PM2024-08-30T18:35:05+5:302024-08-30T18:35:38+5:30

पोलिसांनी तोंडी समज देऊनही डीजेवाल्यांनी आदेशाचे पालन न करता पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली

At Baramati Dahi handi the dj blare exceeded the volume limit 11 Crime against DJ owners  | बारामतीत दहीहंडीला डीजेच्या दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली; ११ डीजे मालक चालकांवर गुन्हा 

बारामतीत दहीहंडीला डीजेच्या दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली; ११ डीजे मालक चालकांवर गुन्हा 

सांगवी (बारामती) : डीजे ला बंदी आसताना देखील बारामती शहरात बुधवारी (दि.२८) रोजी डीजेच्या दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे चित्र दहीहंडी वेळी गुरुवारी संध्याकाळी शहरात जवळपास सर्वच ठिकाणी पाहायला मिळाले. या आवाजामुळे लहान मुलांसह महिला,ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन डीजे बंद करण्याचे आदेश देऊन पोलिसांच्या सूचनांना डावलले गेले. याबाबत भारतीय न्याय संहिता कलम २९२,२९३,२२३ सह मुंबई पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे ११ डीजे चालक व मालकांवर कारवाई करण्यात आली आहॆ. याबाबत फिर्यादी राहुल कल्याण वाघ पोलीस शिपाई  नेमणुक बारामती शहर पोलीस स्टेशन, यांनी फिर्याद दिली आहॆ. 

यामध्ये आर के साऊंड जावेद अमिर शेख (रा.१५९ दत्तवाडी पुणे याचा टेम्पो (क्र. एमएच ०४ एफपी ६०१२),सुरज मधुकर साळवी (रा. लोणंद जि. सातारा याचा टेम्पो (क्र. एम एच १२ एफ बी ०६७६),निखल प्रकाश रा.कराड ता.कराड,जि.सातारा), याचा टेम्पो (क्र.एम एच १३बी ४६००),अभिषेक कानिफनाथ नागे (रा. इंदापुर रोड बारामती ता. बारामती, जि. पुणे) याचा टेम्पो क्र एम एच १२ए आरा ४५९७),संतोष आप्पा मोरे रा. बारामती याचा टेम्पो क्र.एमएच १२ जे के ११६९) संदिप जयवंत शिंदे, गाडी (क्र. एम एच ०४ सिपी २३०१), हुतेफा बागवान् रा.वणवेमळा, बारामती, जि. पुणे) सार्थक संतोष सातव रा. सातववस्ती माळेगाव रोड बारामती)  याची गाडी (क्र. एम एच १२ एच डी २४३०), विजय शंकर माने रा. पाहुणेवाडी ता. बारामती जि. पुणे याची गाडी (क्र.एम एच ०५एस ०५०६) वैभव शिंदे (रा. वाकड पुणे.)याची गाडी (क्र. एम एच १२व्हिटी ३६४५), गणेश राहुल सरोदे,रा बारामती ता. बारामती जि.पुणे याची गाडी (क्र. एम एच ४२ बी ७१३७) डी जे चालक व मालक अशा एकूण ११ जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहॆ.

टेम्पो मध्ये धोकादायक रित्या मोठ्या आवाजात साऊंड लावुन बारामती परिसरात जवळपास असलेल्या हॉस्पिटलकडे दुर्लक्ष करून मोठ्याने आवाज वाढवुन सार्वजनिक शांततेचा भंग केला गेला. यावेळी पोलिसांनी तोंडी समज देवुन ही डीजे वाल्यांनी लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली. वेळोवेळी डीजे साऊंड सिस्टम थांबवण्याच्या सुचना देवुनही आवाजाची मर्यादा कमी करण्या ऐवजी वाढवून डीजे साऊंड सुरूच  ठेवुन जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील आदेशा नुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यात दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी  पासुन ते दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी पर्यंत जारी करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. म्हणून वरील नमुद वहानांवरील चालक व मालक यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९२,२९३,२२३ सह मुंबई पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे असे नमूद फिर्यादीत म्हटले आहॆ.

Web Title: At Baramati Dahi handi the dj blare exceeded the volume limit 11 Crime against DJ owners 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.