बारामतीत गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसासह आरोपीच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 06:04 PM2024-01-11T18:04:07+5:302024-01-11T18:04:23+5:30
रोहित उर्फ बापू निकम (वय ३१, रा. श्रीराम नगर बारामती )असे या आरोपीचे नाव आहे....
बारामती (पुणे) : जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या बारामती शहरातील युवकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. रोहित उर्फ बापू निकम (वय ३१, रा. श्रीराम नगर बारामती )असे या आरोपीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठी एलसीबीचे पथक तयार करण्यात आले होते.१० जानेवारीला पथक फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी बारामती शहरात पेट्रोलिंग सुरू होते. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक़ कुलदीप संकपाळ यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली. रोहित उर्फ बापू निकम याच्याकडे गावठी बनावटीचा पिस्तूल आहे. तो सध्या श्रीरामनगर भिगवण रस्त्यालगत कोणाची तरी वाट बघत थांबला असून त्याचे कमरेला पँटच्या आतील बाजूस एक गावठी पिस्तूल लावल्याचे त्यांना समजले. त्यानंतर पथकाने त्या ठिकाणी जाऊन त्याच्याकडे पिस्तूल असल्याची खात्री करत त्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक गोयल, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, सहा. फौजदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, पोलिस हवालदार अभिजित एकशिंगे, स्वप्निल आहीवळे, पोलिस नाईक नीलेश शिंदे यांनी ही कारवाई केली.