अखेर हरवलेला श्रेयस सापडला; १० तासांच्या शोधानंतर माळेगाव पोलिसांना आले मोठे यश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 08:28 PM2024-11-27T20:28:30+5:302024-11-27T20:33:35+5:30

सांगवी ( बारामती ) : तिसरीत शिक्षण घेत असणारा मुलगा हरवल्या नंतर त्या मुलाचा अवघ्या दहा तासांत शोध घेण्यात ...

At last the lost Shreyas was found; After 10 hours of search, Malegaon police got a big success | अखेर हरवलेला श्रेयस सापडला; १० तासांच्या शोधानंतर माळेगाव पोलिसांना आले मोठे यश

अखेर हरवलेला श्रेयस सापडला; १० तासांच्या शोधानंतर माळेगाव पोलिसांना आले मोठे यश

सांगवी (बारामती ) : तिसरीत शिक्षण घेत असणारा मुलगा हरवल्या नंतर त्या मुलाचा अवघ्या दहा तासांत शोध घेण्यात माळेगाव पोलिसांना मोठे यश आले आहे.  त्याला पोलिसांनी कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अंजनगाव ता. बारामती जि पुणे. येथील संतोष कदम यांचा इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेला मुलगा श्रेयश संतोष कदम (वय ९) हा मंगळवारी (दि.२६) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आईस मी माझे कडील दोन रुपयाचे किराणा दुकानातून काहीतरी खायला घेऊन येतो असे सांगून निघून गेला होता, परंतु बराच वेळ झाल्यानंतर देखील तो घरी न परतल्यामुळे त्याची आई व बहीण तसेच इतर नातेवाईकांनी त्याचा अंजनगाव या गावात तसेच परिसरात शोध घेतला मात्र श्रेयश सापडला नाही.

याबाबत आईने (पुनम संतोष कदम)  श्रेयसचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असल्या बाबतची फिर्याद माळेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 293/2024  भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी फिर्यादी बाबत नमूद घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांच्याकडे सोपवून तात्काळ अपहृत मुलगा श्रेयसचा शोध घेण्यासाठी चार वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली होती.

अपहरण झालेल्या श्रेयसचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती. त्यानुसार घटनास्थळाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही गोपनीय माहितीच्या आधारे तपासून सदर मुलाचा शोध पणदरे (ता. बारामती) परिसरात घेण्यात माळेगाव पोलिसांना मोठे यश आले. यानंतर श्रेयसला आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप परत देण्यात आहे. बुधवार (दि.२७) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तो पणदरे सापडला.

सदरची कामगिरी माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर,देविदास साळवे, तुषार भोर, पोलीस अंमलदार विजय वाघमोडे, राहुल पांढरे,ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे, अमोल राऊत, नितीन कांबळे, गणेश खंडागळे, नंदकुमार गव्हाणे, धीरज कांबळे, महिला पोलीस अंमलदार सुनिता पाटील यांनी केली आहे.

 

Web Title: At last the lost Shreyas was found; After 10 hours of search, Malegaon police got a big success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.