कवितेतून अटलजींना आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 01:47 AM2018-08-25T01:47:42+5:302018-08-25T01:48:37+5:30

‘‘अटलजी तुमच्या रूपात हा देश उंच वाटतो, भरल्या मनात या तुम्हा भरून पाहतो.’’ नंदकुमार मुरडे यांनी अर्पिलेल्या या काव्यपंक्ती. साहित्य संवर्धन समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिकांनी भारताचे माजी पंतप्रधान

 Atal ji honored in poetry | कवितेतून अटलजींना आदरांजली

कवितेतून अटलजींना आदरांजली

googlenewsNext

पिंपरी : ‘‘अटलजी तुमच्या रूपात हा देश उंच वाटतो, भरल्या मनात या तुम्हा भरून पाहतो.’’ नंदकुमार मुरडे यांनी अर्पिलेल्या या काव्यपंक्ती. साहित्य संवर्धन समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिकांनी भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न आणि संवेदनशील कवी अटलबिहारी वाजपेयी यांना बिना इंग्लिश स्कूल, आकुर्डी येथे काव्यांजली अर्पण केली.

लष्करातील निवृत्त नायब सुभेदार यशवंत पानसरे अध्यक्षस्थानी होते. बिना एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष इकबाल खान, बी़ एस़ बनसोडे, कवयित्री सविता इंगळे, साहित्य संवर्धन समितीच्या कार्याध्यक्षा शोभा जोशी, अंतरा देशपांडे या वेळी उपस्थित होते. इकबाल खान म्हणाले, ‘‘विरोधकांची मने आपल्या वाणीने जिंकणारा अटलजी सारखा माणूस पुन्हा होणे नाही.’’ ‘अट्टल कवी मनाने निर्मल राजकारणी धुरंधर’ अशा शब्दांत कवी आय़ के़ शेख यांनी कविता सादर केली. डॉ़ पी़ एस़ अगरवाल यांनीही कविता सादर केली. प्रा़ तुकाराम पाटील, फुलवती जगताप, सुभाष चव्हाण, तानाजी एकोंडे, रघुनाथ पाटील, प्रभाकर चव्हाण, आनंद मुळूक, राधा वाघमारे, बाळासाहेब घस्ते, कैलास भैरट, अरुणा पानसरे, मुरलीधर दळवी, रजनी अहेरराव, माधुरी ओक यांनी अटलजींना कवितेतून आदरांजली समर्पित केली. साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले तर उमेश सणस यांनी आभार मानले. निवृत्ती पानसरे म्हणाले, ‘‘सैनिक हाच आमचा धर्म आहे. जात, पात, पंथ, या पलीकडे जाऊन एकजुटीने भारतीय जवान सीमेवर डोळ्यांत तेल घालून काम करतात म्हणूनच अटलजी सारखे द्रष्टे पोखरणला अणुस्फोट करून आपल्या देशाला बलवान बनवतात.’’

Web Title:  Atal ji honored in poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.