क्रीडापटूंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे : लांडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:09 AM2020-12-26T04:09:52+5:302020-12-26T04:09:52+5:30

अद्वैत क्रीडा केंद्रातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ क्रीडापटूंचा ८० वर्षाचा युवा योद्धा पुरस्कार देऊन सन्मान ...

Athletes should make the country famous: Wolves | क्रीडापटूंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे : लांडगे

क्रीडापटूंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे : लांडगे

Next

अद्वैत क्रीडा केंद्रातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ क्रीडापटूंचा ८० वर्षाचा युवा योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केला. याप्रसंगी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ, नितीन कदम उपस्थित होते.

----------------

ज्येष्ठ भाऊ आणि बहिणीला मदतीचा हात

पुणे : कोरोनाने अनेकांचे कंबरडे मोडले आहे. बऱ्याच लोकांचे रोजगारही गेले आहेत. अशा परिस्थितीत चिरमुले आजोबांनी जगण्याची जिद्द समोर ठेवून एक आदर्श जगासमोर मांडला आहे. या ८१ वर्षीय आजोबांनी आपल्या ६५ वर्षाच्या बहिणीसोबत किरकोळ विक्री चालू केली आहे. यांना अखिल भारतीय महासंघाच्या वतीने आर्थिक मदतीबरोबरच दोन, तीन महिने पुरेल एवढा किराणा माल दिला. तसेच वैद्यकीय मदतीची हमी दिली. या उपक्रमात जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे, जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी, श्रीकांत देशपांडे, रवींद्र तारे, सुनील देशपांडे, मिलिंद देशपांडे सहभागी झाले होते.

Web Title: Athletes should make the country famous: Wolves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.