पुण्यात दुकानासह एटीएम जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 04:11 AM2017-12-02T04:11:37+5:302017-12-02T04:11:48+5:30
वारजे माळवाडी मधील एनडीए रस्त्यावर असलेल्या एका इलेक्ट्रिकल दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील साहित्यासह एका बँकेचे एटीएम मशीन खाक झाले. दुकानातील इलेक्ट्रॉनिक आणि प्लास्टिकजन्य जळून खाक झाल्या.
पुणे : वारजे माळवाडी मधील एनडीए रस्त्यावर असलेल्या एका इलेक्ट्रिकल दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील साहित्यासह एका बँकेचे एटीएम मशीन खाक झाले. दुकानातील इलेक्ट्रॉनिक आणि प्लास्टिकजन्य जळून खाक झाल्या. एटीएममधील रोकड सुरक्षित आहे की नाही, याबाबत कळू शकले नाही.
एनडीए रस्त्यावर इंडियन आॅईलच्या आवळे पेट्रोल पंपासमोर असलेल्या सरस्वती इलेक्ट्रिकल या दुकानातून पहाटे दोनच्या सुमारास धूर येत असल्याचे वारजे पोलीस स्टेशनच्या गस्त पथकाला दिसले. विवेक रंगनाथ कोकणे यांचे ते दुकान असून, रात्री साडेदहा वाजता ते दुकान बंद करून घरी गेले होते. समोरच पेट्रोल पंप असल्याने पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवून आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून सुरक्षा कडे केले. अग्निशमन दलाच्या गाड्या पाहोचेपर्यंत दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी पेट घेऊन आगीचा भडका उडाला. दुकानातच एक आयसीआयसीआय बँकेचे लहान एटीएम मशीन बसवण्यात आले होते. त्याला देखील आगीची झळ बसली.