एटीएम मशीन चोरणाऱ्या टोळीला सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:11 AM2021-05-21T04:11:55+5:302021-05-21T04:11:55+5:30

अन्वरपुत्र अमली खा (वय २५ रा. भंगू पोलीस, ता. तावडू, हरियाणा), मुस्तफा मोहम्मद मेव (वय २४ रा. माचरोली, ता. ...

ATM machine theft gang jailed | एटीएम मशीन चोरणाऱ्या टोळीला सश्रम कारावास

एटीएम मशीन चोरणाऱ्या टोळीला सश्रम कारावास

Next

अन्वरपुत्र अमली खा (वय २५ रा. भंगू पोलीस, ता. तावडू, हरियाणा), मुस्तफा मोहम्मद मेव (वय २४ रा. माचरोली, ता. नूह, हरियाणा), तालीम आलीम मेव (वय २६ रा. दौहज, ता. दौहज, हरियाणा) इरसार खुर्शिद मेव (वय २५ रा. पाली, ता. गोपाळगड, जि. भरतपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, मंचर शहरातील मुळेवाडी रस्त्यावर असणाऱ्या ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन २६ नोव्हेंबर २०२० रोजी चोरट्यांनी लांबविले होते. चोरट्यांनी पाच लाख रुपयांची रोकड लंपास केली. दोन महिन्यांच्या फरकाने २८ जानेवारी रोजी मंचर शहरातील स्टेट बँकेत असणाऱ्या कॅश डिपॉझिट मशीनवर चोरट्यांनी डल्ला मारून १८ लाख ५३ हजार ८०० रुपये रोख रक्कम व ५० हजार रुपये किमतीचे कॅश डिपॉझिट मशीन पळविले होते. मंचर पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने या दोन्ही चोरींचा तपास लावण्यात यश मिळवले होते. पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पोलीस नाईक विलास साबळे, पोलीस नाईक राजेंद्र हिले, विठ्ठल वाघ, महेश भालेकर, अमर वंजारी, अंकुश मिसाळ, शांताराम सांगडे या पथकाने राजस्थानमध्ये जाऊन आरोपीना अटक केली होती.

घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. मुळीक यांच्यासमोर हा खटला चालला. सरकारी वकील सुमित्रा पाचारणे-शेटे यांनी केलेला युक्तिवाद, साक्षीदारांच्या साक्षी आणि सादर केलेल्या पुराव्यांवरून आरोपींवरील दोन्ही खटले शाबीत झाल्याने या टोळीला दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी तीन महिने अशी एकत्रित सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता.

Web Title: ATM machine theft gang jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.