शिरूर येथील एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस, ३ आरोपींकडून चोरीच्या ४ मोटरसायकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:03+5:302021-07-29T04:10:03+5:30

दि. २० जुलै २०२१ रोजी रात्री १२:३० च्या सुमारास पुणे नगर रोड, सरदवाडी येथे असलेले ॲक्सिस बँकचे एटीएम ...

ATM theft case uncovered in Shirur, 4 motorcycles stolen from 3 accused | शिरूर येथील एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस, ३ आरोपींकडून चोरीच्या ४ मोटरसायकली

शिरूर येथील एटीएम चोरीचा गुन्हा उघडकीस, ३ आरोपींकडून चोरीच्या ४ मोटरसायकली

Next

दि. २० जुलै २०२१ रोजी रात्री १२:३० च्या सुमारास पुणे नगर रोड, सरदवाडी येथे असलेले ॲक्सिस बँकचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅसकटरचे साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. याबाबत धनंजय दशरथ गायकवाड (वय २८, रा. कोंढापुरी, ता. शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत आदेश दिलेले होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. पथकाने आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासणी करून आरोपींची माहिती काढली असता ते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा या भागातील असल्याची माहिती समजली. पथकाने अहमदनगर जिल्ह्यात जाऊन वेशांतर करून त्यांच्या हालचालीवर पाळत ठेवली. दिनांक २७ जुलै रोजी आरोपी आकाश ऊर्फ नीलेश अनिल गायकवाड (वय २७, रा. नेवासा, जि. अहमदनगर), तन्मय ऊर्फ सोनल संदीप साळवे (वय २१, रा. नेवासा फाटा) आशिष माणिक डुकरे (वय २१, रा. नेवासा फाटा, मुकिंदपूर, ता. नेवासा) यांनी वाळूंज एमआयडीसी येथून पहाटेच्या सुमारास बेलापूर येथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे पोलीस खाक्यामध्ये चौकशी केली असता त्यांनी ७ दिवसांपूर्वी शिरूर, सरदवाडी येथील एटीएम गॅस स्प्रेच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून औरंगाबाद वाळूंज एमआयडीसी येथून ४ मोटरसायकली चोरी केल्याचेही सांगितले आहे. चोरीच्या ४ मोटरसायकली किं.रू.२,५५,०००/- (दोन लाख पंचावन्न हजार)च्या तिघा आरोपींकडून जप्त करून त्यांच्याकडून मोटरसायकल चोरीचे ४ व पुणे जिल्ह्यातील एटीएम चोरीचा १ असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदर तिघा आरोपींना पुढील कारवाईसाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले आहे. आरोपी हे अट्टल सराईत गुन्हेगार असून, त्यांनी अशा प्रकारचे आणखीन गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील अधिक तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, अभिजित एकाशिंगे, काशिनाथ राजापुरे यांनी केली आहे.

Web Title: ATM theft case uncovered in Shirur, 4 motorcycles stolen from 3 accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.