लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात अल्पवयीन युवतीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 02:47 PM2022-06-24T14:47:58+5:302022-06-24T14:49:33+5:30
डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान हा प्रकार घडला
पुणे : अल्पवयीन युवतीबरोबर प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यातून ही युवती गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी पाटील इस्टेट येथील एका १७ वर्षांच्या युवतीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राकेश निरगुनकर (वय २३, रा. करमोळी, तानाजी पाटीलनगर, पौड) याच्यावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार वारजे परिसरातील एका पत्र्याच्या खोलीत, पौडमधील तानाजी पाटील नगरातील करमोळी येथे डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला.
राकेश निरगुनकर याने फिर्यादी यांचा पाठलाग करून तिच्याबरोबर ओळख करून घेतली. तिच्याबरोबर प्रेमसंबंध निर्माण केले. मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण दोघे लग्न करू, असे आमिष दाखवून तिच्यावर वारजे, पौड येथील घरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही युवती गर्भवती राहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या युवतीने पौड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती. तेथून तो वारजे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.