सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:09 AM2021-06-17T04:09:03+5:302021-06-17T04:09:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : अल्पवयीन असलेल्या १७ वर्षीय मुलीवर तिच्या सख्ख्या भावाने लैंगिक अत्याचार केला. तसेच कोणाला काहीही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : अल्पवयीन असलेल्या १७ वर्षीय मुलीवर तिच्या सख्ख्या भावाने लैंगिक अत्याचार केला. तसेच कोणाला काहीही न सांगण्याची धमकीही दिली. मात्र, अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. बिजलीनगर, चिंचवड येथे १५ एप्रिल ते मे २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी बुधवारी (दि. १६) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २१ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता, त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलगी ही आरोपीची सख्खी लहान बहीण आहे. आरोपी हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तर पीडित मुलगी बारावीमध्ये शिकत आहे. ते दोघेही भाऊ-बहीण त्यांच्या राहत्या घरात हॉलमध्ये झोपले होते. त्यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत बळजबरी करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कोणास काही न सांगण्याची धमकीही आरोपीने दिली. पीडित मुलगी गर्भवती झाल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. वैद्यकीय तपासणी केली असता, पीडित मुलगी आठ आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक नीता उबाळे तपास करीत आहेत.