टीव्हीचा आवाज वाढवल्याने कुटुंबावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:02+5:302021-04-27T04:11:02+5:30

याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महादेव जयसिंग आरसूळ (वय ३६), त्यांची पत्नी रंजना ...

Attack on the family by raising the volume of the TV | टीव्हीचा आवाज वाढवल्याने कुटुंबावर हल्ला

टीव्हीचा आवाज वाढवल्याने कुटुंबावर हल्ला

Next

याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी महादेव जयसिंग आरसूळ (वय ३६), त्यांची पत्नी रंजना (वय ३२), मावशी पद्मिनी कदम (वय ५५), मावस भाऊ शंकर कदम ( वय ३८) अशी जखमींची नावे आहेत.

याप्रकरणी पप्पू पांडव, ओंकार पांडव, दत्ता पांडव, राहणार शांतीनगर, धनकवडी व पप्पू पांडवच्या मेहुण्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकट

फिर्यादी व आरोपी शेजारी शेजारी रहातात. फिर्यादी महादेव यांच्या मुलाचे कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी आरोपी त्यांच्या घरातील टीव्ही व म्युझिक सिस्टिमचा आवाज मोठा ठेवत असल्याने त्यांच्यात वाद झाले होते. याचा राग पांडव परिवाराच्या मनात होता. दरम्यान शनिवारी दुपारी पप्पू पांडव यांनी महादेव यांना रस्त्यात अडवले. तू माझ्याकडे खुन्नसने का बघतोस म्हणून शिवीगाळ केली. यानंतर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्‍यावर व हाताच्या पंजावर कोयत्याने वार केले. त्यांची पत्नी, मावाशी व मावस भावावरही लोखंडी हत्याराने वार केले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण मदने करत आहेत.

Web Title: Attack on the family by raising the volume of the TV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.