दौंड येथे रेल्वेचालकावर हल्ला, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:08 AM2021-07-12T04:08:36+5:302021-07-12T04:08:36+5:30
दौंड शहरापासून दूर अंतरावर गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे स्टेशन सुरू झाले आहे. पुणे - मनमाड व्हाया दिल्लीकडे ...
दौंड शहरापासून दूर अंतरावर गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे स्टेशन सुरू झाले आहे. पुणे - मनमाड व्हाया दिल्लीकडे जाण्यासाठी प्रवाशांचा आणि रेल्वेचा वेळ वाचावा म्हणून गावा बाहेर रेल्वे स्थानक सुरू झाले आहे.उसाच्या शेतीने रेल्वे स्टेशनला वेढलेले आहे. रेल्वे स्थानकातून रेल्वेचालक महेंद्र पंडित ड्यूटीवरून दुचाकीने घरी येत असताना शनिवार ( दि. १० ) रोजी रात्री १० वाजता परिसरातील मोरीत त्यांना तिघांनी अडवून त्यांच्यावर धारदार चाकूने वार करीत मारहाण केली. त्यांच्याकडील दोन हजार रुपये तसेच हेडफोन हिसकावून त्यांना जखमी केले. महेंद्र पंडित यांनी आरडाओरडा केल्याने रेल्वे पोलीस ,रेल्वे सुरक्षा बल आणि काही रिक्षाचालक घटनास्थळी आले आणि आरोपींना पकडले. या प्रकरणी काशीम शेख ( वय २२, रा. वडारगल्ली , दौंड ), संदेश चव्हाण ( वय १८, रा. पानसरेवस्ती , दौंड ) , दिलीप गुजराती ( वय २०, रा. वेगणेवस्ती , दौंड ) या तिघांना अटक करण्यात आली आहे
रेल्वेवर गुन्हा दाखल करावा लागेल
नव्याने सुरू केलेल्या दौंड रेल्वे स्टेशनवर प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काही ठोस उपाय योजना नाही. परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार म्हणून रेल्वे प्रशासनावर गुन्हा दाखल करावा लागेल. या कामी लवकरच रेल्वे प्रवाशांची बैठक बोलावणार आहे.
प्रेमसुख कटारिया
(अध्यक्ष, दौंड --पुणे प्रवासी संघ )
या रेल्वे मोरीत अंधाराचा फायदा घेत लूटमार केली जाते नुकताच या मोरीत रेल्वे मोरीत रेल्वे चालकावर शस्त्र हल्ला झाला.