भांडणात मदत न केल्याने तरुणावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:56+5:302021-09-08T04:16:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात मदतीला न आल्याचा राग मनात धरून दोघा गुंडांनी तरुणाच्या घरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात मदतीला न आल्याचा राग मनात धरून दोघा गुंडांनी तरुणाच्या घरात शिरून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच घराबाहेर पार्क केलेल्या २ दुचाकीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. हा प्रकार येरवड्यातील कंजारभट वस्तीत मंगळवारी पहाटे सव्वापाच वाजता घडला.
याप्रकरणी कुणाल मोरे (वय २५, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मोरे याच्या तोंडओळखीचे दोघांना दारू पिण्याचे व्यसन आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणामध्ये एका व्यक्तीला मारहाण होत होती. यावेळी फिर्यादी यांनी त्यांना कोणतीही मदत न करता निघून गेले होते. त्या रागातून ते दोघे मंगळवारी पहाटे फिर्यादी यांच्या घरी आले. त्यांनी दरवाजावर लाथ मारून शिवीगाळ करत फिर्यादी याला बाहेर बोलावले. आज तुझा गेमच करतो, असे म्हणत त्याच्यावर पालघनने वार केला. फिर्यादी यांनी तो हुकवला व ते पळत पुन्हा घरात जाऊन दार लावून घेतले. त्यानंतर या दोघा गुंडांनी घरासमोर पार्क केलेल्या दोन दुचाकींवर पेट्रोल टाकून त्यांना आग लावली. येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.