तरुणीवर हल्ला करणा:याची जामिनावर मुक्तता
By admin | Published: October 30, 2014 11:34 PM2014-10-30T23:34:12+5:302014-10-30T23:34:12+5:30
दिघीत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने हल्ला करणा:या तरुणावर विo्रांतवाडी पोलिसांनी विशेष मेहेरनजर दाखविली आहे.
Next
पुणो : दिघीत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने हल्ला करणा:या तरुणावर विo्रांतवाडी पोलिसांनी विशेष मेहेरनजर दाखविली आहे. त्या तरुणावर खुनीहल्ल्याचा गुन्हा दाखल न करता, मारहाणीचे कलम लावल्याने न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. वरिष्ठ अधिका:यांना याची दखल घेऊन विचारणा केल्यानंतर पुन्हा एकदा या गुन्ह्याची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
बुधवारी दुपारी एका 2क् वर्षीय युवतीवर सत्यवान हळवे (वय 27, रा. दिघी) या तरुणाने चाकून मानेवर, हातांवर, खांद्यावर सात वार केले. त्या वेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्या तरुणीच्या मदतीला येऊन, तिला त्याच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात
आले होते.
घटना गंभीर असल्याने याप्रकरणी भादंवि 3क्7 अन्वये खुनीहल्ल्याचा गुन्हा दाखल होणो अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात मारहाणीचे कलम भादंवि 323 लावण्यात आले.
पोलीस उपायुक्त मनोज पाटील
यांना याबाबतची माहिती मिळताच, त्यांनी या संवेदनशील गुन्ह्याचा
तपास करून कारवाईचे आदेश दिले आहेत.
पीडित तरुणी ही पूना कॉलेजमध्ये बी-कॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. सत्यवानचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते, त्याने तिच्या घरच्यांकडे लग्नासाठी मागणीही घातली होती. मात्र, त्याला नकार दिल्याने रागातून त्याने बुधवारी तिच्यावर हल्ला केला. (प्रतिनिधी)