बेटिंग घेणाऱ्या टोळीला अटक

By admin | Published: April 25, 2017 04:22 AM2017-04-25T04:22:09+5:302017-04-25T04:22:09+5:30

आयपीएलच्या दिल्ली डेअर डेव्हिल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स मॅचवर सट्टा घेणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात सापडली.

Attacks on the betting party | बेटिंग घेणाऱ्या टोळीला अटक

बेटिंग घेणाऱ्या टोळीला अटक

Next

पुणे : आयपीएलच्या दिल्ली डेअर डेव्हिल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स मॅचवर सट्टा घेणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात सापडली. पिंपरी कँपमध्ये पोलिसांनी छापा टाकून टोळीला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या युनिट १ ने ही कारवाई केली.
या छाप्यामध्ये अनिल घनश्याम सिंग (वय २९, रा. हाऊसिंग बोर्ड २१/६, पिंपरी कँप), प्रतीक पालवे (वय २६, रा. सी ९/१२ पिंपरी), तुलसी ऊर्फ विकी साधुमल केवलानी (वय ३६, रा. बी ब्लॉक ६/३ पिंपरी) आणि आकाश जयराम अडवाणी (वय २१, सुखवाणी कॅस्टल, पिंपरीगाव) यांना अटक करण्यात आली. क्रिकेट मॅच बेटिंगचे प्रमुख बुकी अनिल जवराणी व दीपू वादवानी (पिंपरी कॅम्प) हे दोघे पळून गेले.
अपर पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) गुन्हे दीपक साकोरे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सहायक निरीक्षक धनंजय कापरे, उपनिरीक्षक दिनेश पाटील, सहायक फौजदार शशिकांत शिंदे, रवींद्र कदम, समाजी भोईटे, पोलीस कर्मचारी मेहबूब, प्रकाश लोखंडे, रिजेवान जिनेडी, उमेश काटे, तुषार खडके, इरफान, सुधाकर साने, सुभाष पिंगळे, अशोक माने, प्रशांत गायकवाड यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)

Web Title: Attacks on the betting party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.