गुण वाढविण्यासाठी लाच घेणा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:30 AM2017-07-20T00:30:38+5:302017-07-20T00:30:38+5:30
सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्राध्यापकामार्फत सिव्हिल इंजिनिअरच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाला
Next
> ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.20 - सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्राध्यापकामार्फत सिव्हिल इंजिनिअरच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाला पकडण्यात आले. प्रत्यक्षात प्राध्यापकाऐवजी आपल्या मित्राच्या मदतीने फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विठ्ठल रमेश साळुंखे (वय २७, रा़ सुंदरनगर, कात्रज कोंढवा रोड, कात्रज) आणि त्यांचा मित्र अविनाश कांबळे अशी त्यांची नावे आहेत. तक्रार देणारा विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरींगच्या दुसºया वर्षाला असून तो अनुतिर्ण झालेल्या दोन विषयाचे गुण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकामार्फत वाढवून उत्तीर्ण करुन देतो, असे त्याला एकाने सांगितले़ एका विषयाला २० हजार रुपये असे ४० हजार रुपयांची मागणी केली.
या विद्यार्थ्याने १८ जुलैला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ विठ्ठल सांळुखे याच्याकडे अधिका-यांनी पडताळणी केली़. या विद्यार्थ्याकडून तीन विषयाचे ६० हजार रुपयांपैकी अॅडव्हान्स म्हणून ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार हा विद्यार्थी बुधवारी विठ्ठल साळुंखे याच्या कात्रज येथील घरी गेला. तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्यापूर्वी साळुंखे याने विद्यापीठातील प्राध्यापकाना फोन लावला व या विद्यार्थ्याशी बोलणे करुन दिले. त्याबरोबर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने विठ्ठल साळुंखे याला ताब्यात घेऊन चौकशी केली़. त्याने ज्याला प्राध्यापक म्हणून फोन लावून दिला तो त्याचाच मित्र अविनाश कांबळे असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठातील कोणी प्राध्यापक किंवा कर्मचारी सहभागी आहेत का याचा तपास सुरु आहे.