एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
By Admin | Published: June 24, 2017 05:47 AM2017-06-24T05:47:34+5:302017-06-24T05:47:34+5:30
येथील औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेचे एटीएम काही अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी या परिसरात
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेचे एटीएम काही अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांनी या परिसरात असणारे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तोडून एटीएम मशीन तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात चोरट्यांच्या वाढत्या कारवाईकडे वेळीच लक्ष पोलीस प्रशासनाने देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
कुरकुंभ येथील भारतीय स्टेट बँक ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाच्या जवळच आहे. औद्योगिक क्षेत्रात जरी असला तरी हा भाग संध्याकाळी जवळपास निर्मनुष्य असतो. त्यामुळे या पूर्वीही या एटीएममधून पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना लुटण्याचे प्रकार घडले आहेत.
दरम्यान, या परिसरात असणारे औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयात एक सुरक्षारक्षक कार्यरत असतो. मात्र बँकेचा व या सुरक्षेचा काहीही संबंध नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना होताना दिसत आहेत. कुरकुंभ येथे सध्या तीन एटीएम असून, तेथे एकही सुरक्षारक्षक नाही. या आधी महाराष्ट्र बँकेचे एटीएम देखील फोडण्याचा प्रकार घडलेला आहे, मात्र तरीदेखील या बँकांच्या परिसरात होत असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत.