शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न
By admin | Published: May 15, 2017 01:41 AM2017-05-15T01:41:52+5:302017-05-15T01:41:52+5:30
सहाय म्हणाले, हवामान विभागामार्फत वेगवेगळ्या सेवा पुरविण्यात येतात़ पाऊस कधी येणार, किती पडणार, याबरोबरच कमाल, किमान तापमान असे राहील़ हवामानाचा आरोग्यावर काय परिणाम होईल़
सहाय म्हणाले, हवामान विभागामार्फत वेगवेगळ्या सेवा पुरविण्यात येतात़ पाऊस कधी येणार, किती पडणार, याबरोबरच कमाल, किमान तापमान असे राहील़ हवामानाचा आरोग्यावर काय परिणाम होईल़ पाऊस उशिरा येणार असेल तर शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, याविषयीची माहिती दिली जाते़ एप्रिल महिन्यात पावसाचा तीन महिन्यांचा अंदाज अगोदर जाहीर केला जातो़ त्यानंतर जूनमध्ये सविस्तर माहिती दिली जाते़
दर आठवड्याला पुढील चार आठवड्यांत पावसाची स्थिती कशी राहील, याचा अंदाज सांगितला जातो़ विशिष्ट भागात जादा पाऊस पडणार असेल तर तो किती होईल, याचा अंदाज दिला जातो़ थंडीत किमान तापमान कसे राहील, उन्हाळ्यात कमाल तापमान, उष्णतेची लाट कधी असू शकते, याची माहिती दिली जाते़ याबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने उष्ण हवामानाची माहिती दिली जाते़ उष्ण हवामानाचा शरीराला तीन प्रकारे त्रास होऊ शकतो़ दिवसभरातील जास्त तापमान, आर्द्रता वाढली आणि रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली तर त्याचा त्रास होतो़ त्याची माहिती आरोग्य विभागाला दिली जाते़ पण वाढत्या हवामानामुळे किती जणांना मलेरिया, डेंग्यू झाला याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही़ तसेच पावसाबाबतची माहिती केंद्र शासनाच्या विविध विभागांना दिली जाते़ या माहितीचा उपयोग करून हे विभाग कोणती काळजी घेतात़ त्यादृष्टीने कोणते तयारी करतात, याची माहिती मात्र आमच्यापर्यंत येत नाही़ एखाद्या भागात कमी वेळात किती पाऊस पडू शकेल, याचा अंदाज हवामान विभागामार्फत दिला जातो़ तो संबंधित विभागाला कळविला जातो़ एखाद्या भागात किती पाऊस पडेल, हे आम्ही सांगू शकतो; पण ते पावसाचे पाणी कोठे जाईल, त्याचा काय परिणाम होईल, हे आम्ही सांगू शकत नाही़ आम्ही व्यक्त केलेल्या अंदाजावर संबंधित विभागाने पुढील कार्यवाही करून त्यादृष्टीने खबरदारी घेण्याची आवश्यकता असते़ पण, त्या विभागाने काय खबरदारी घेतली, याची माहिती आमच्यापर्यंत येत नाही़ त्यामुळे आम्ही व्यक्त केलेल्या अंदाजाला काही मर्यादा येतात़ उत्तराखंड प्रलयावेळी हवामान विभागाने पावसाबाबत इशारा दिला होता़ पण, पुढे काय झाले, याची माहिती मिळाली नाही़ या घटनेनंतर आता अन्य विभाग विशेष आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आमच्याशी संपर्कात असतात़
शेतीविषयक बैठका होतात़ त्यात सर्व विभागांना बोलावले जाते़ पण, हवामान विभाग त्यात नसतो़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बैठकांना हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलविण्यास सुरुवात केली. वीज पडण्याच्या घटनेविषयी नुकतीच आम्ही चार कार्यशाळा घेऊन त्याची माहिती दिली़
ढग तयार होणे, त्या वेळी असलेल्या वाऱ्याचा वेग याची माहिती मिळणे अवघड असते़ त्यामुळे आम्ही एका मोठ्या भागात पाऊस पडू शकतो, असा अंदाज देतो़ एका भागात स्थानिक पातळीवर पावसाची माहिती ३ तास अगोदर मिळते़ अनेकदा पुण्यासारख्या शहरात एका भागात खूप पाऊस पडतो, त्याच वेळी दुसरीकडे पडत नाही़ अशा स्थानिक घटनांचा अंदाज व्यक्त करणे अवघड असते़ त्याचा अंदाज जास्तीतजास्त एक तास अगोदर देता येतो़ असा अंदाज व्यक्त करण्यासाठी रडारचे योगदान महत्त्वाचे असते़ विमानतळावरील रडारची माहिती मिळणार असल्याने पुढील काळात अधिक अचूक अंदाज व्यक्त करणे शक्य होणार आहे़