आमदारांचा आयत्या कामांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न उघडा पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:50+5:302021-02-24T04:11:50+5:30
नीरा : पुरंदरच्या आमदारांना जवळपास दीड वर्षात तालुक्यात दमडीचे काम आणता आले नाही. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अनेक ...
नीरा : पुरंदरच्या आमदारांना जवळपास दीड वर्षात तालुक्यात दमडीचे काम आणता आले नाही. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अनेक आयत्या कामांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पण तो वेळोवेळी उघडा पडला आहे, अशा शब्दात जि. प. सदस्या शालिनी पवार यांनी टीकास्त्र सोडले.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर पिंगोरी ग्रामस्थांनी बहिष्कार घातल्यानंतर, वाल्हे - पिंगोरी - साकुर्डे रस्त्याचे काम आता सुरू झाले आहे. मंगळवारी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार यांच्या हस्ते पिंगोरी येथे रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जि. प. सदस्य दिलीप यादव, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी पवार, माजी सभापती अतुल म्हस्के, गिरीश पवार, आडाचीवाडीचे सरपंच दत्ता पवार, वागदरवडीच्या सरपंच उषा पवार, पिंगोरीचे माजी उपसरपंच धनंजय शिंदे, सदस्य ठकसेन भोसले, सागर भुजबळ, राहुल यादव, प्रकाश शिंदे, सुनील शिंदे, तेजस शिंदे, अजय भोसले, ओमकार सुतार, प्रणव शिंदे, राकेश जंगम यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या रस्त्याला मंजुरी मिळवली होती. मधल्या काळात आचारसंहिता आणि कोविड परिस्थितीमुळे शासनाने कामे सुरू करण्यास स्थगिती दिली होती. पिंगोरी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कारही घातला होता. याबाबत शिवतारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही बाब घातल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक पार पडली होती. त्यात लवकरात लवकर काम चालू करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते.
२३ नीरा
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना शालिनी पवार, उपस्थित नलिनी लोळे व शिवसेनेचे कार्यकर्ते.